*आता आमदार ॲड आकाश फुंडकर झालेत पाणीदार आमदार…*
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक..
*खामगाव मतदार संघातील ३२ हजार शेती होणार ओलीत*
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे प्रत्येक पक्ष आता जाहीर सभा आणि विविध कार्यक्रमांवर भर देत आहे. यामध्ये काल रविवारी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघात 2365 कोटी रुपयांच्या कामांचे शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले यावेळी फडणवीस यांनी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर हे आधी वजनदार नंतर दमदार तर आता पाणीदार आमदार झाले असे सांगून त्यांचे तोंड भरून कौतुक केले.
रविवारी खामगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या 2365 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला..या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून, स्वतःच्या हस्ते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आकाश फुंडकर यांचे कौतुक केले आहे. आपल्या भाषणातून फडणवीस म्हणाले कि, या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य हे की जेव्हा आकाशभाऊ निवडून आले त्यावेळी त्यांना लोक वजनदार आमदार म्हणायचे त्याच्यानंतर त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम पाहून लोक त्यांना दमदार आमदार म्हणायचे आज पासून आकाशभाऊ च नाव पाणीदार आमदार म्हणून या ठिकाणी होणार आहे. कारण आता या मतदार संघाचे चित्र त्यांच्या नेतृत्वामध्ये बदलत आहे. एकीकडे जिगाव मुळे मोठ्या प्रमाणात मतदार संघाची गावच्या गाव ही या ठिकाणी पाणीदार होणार आहेत. आपण जिगावला मोठ्या प्रमाणात चालना दिली आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जर काही केला तर बांधायचं पण शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाईपलाईन द्वारे पाणी घेऊन जायचं शेतकऱ्याला थेट बांधावर पाणी देऊन द्यायचं अशा प्रकारचा निर्णय आपण केला. आज 7000 कोटी रुपये आपण जिगाव प्रकल्पा करता या ठिकाणी दिले आणि त्याचं काम अतिशय वेगाने आपण पूर्णत्वाला नेतो आहोत आणि त्यातलाच एक भाग म्हणून खामगाव मतदार संघामध्ये ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येणार आहे. त्यामुळे कोरडवाहूचा शिक्का पूर्णपणे पुसला जाईल आणि आमचा भाग पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे बागायती भाग म्हणून आपल्याला आता ओळखता येईल असे ते म्हणाले…
यावर प्रतिक्रिया देतांना आमदार आकाश फुंडकर यांनी सांगितले कि, निश्चित कोणतेही काम करत असताना आपण जीव लावून काम करतो आणि आपल्या वरिष्ठांनी जेव्हा कौतुकाची थाप दिली तेव्हा निश्चित खूप आनंद होतो. पण हा आनंद तेव्हाच होईल की ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल आणि सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचेल आणि शेतकरी हा संरक्षित शेती आणि शेती करायला लागेल तेव्हा निश्चितहा आनंद द्विगुणित होणार आहे. खामगाव मतदार संघातील 30 ते 32 गावां मधील 32 हजार हेक्टर जमिनीला जिगाव प्रकल्पातील पाण्याचा पहिल्या टप्प्यात फायदा होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखीन गावे त्यामध्ये येतील. असे ते म्हणालेत…
मतदार संघात शेकडो कोट्यवधी रुपयांची विकास कामे झालीत. यामुळे विरोधकांना पोटशुळ उठते. त्यावर ते विनाकारण टिका करतात. त्यातून बऱ्याच वेळा त्यांचे अज्ञान देखील प्रदर्शीत होते. त्यांना आम्ही आमच्या पध्दतीने हाताळतोच परंतु अशा विरोधकांना आपण एखाद टेरामायसिनचे इन्जेक्शन देऊन कायमची पोटदुखी बंद करावी अशी मिश्कील मागणी आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस यांच्याकडे आपल्या भाषणातून केली. याबाबत विचारले असता
तसेच यावेळी आमदार आकाश फुंडकर विरोधकांवर टीका करताना म्हणाले की, यावरच खुलासा आमदार फुंडकर यांनी केला.