*राज्यातील एक मात्र दिव्य वारकरी भावनाचा लोकार्पण सोहळा आज*
आ संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतील वारकरी भवन आले पुर्णत्वास
बुलढाणा
बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेले राज्यातील एक मात्र दिव्य वारकरी भावनांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर लोकार्पण सोहळा मंगळवार 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता रामनगर परिसरात आयोजित करण्यात आला आहे.
बुलढाणा परिसरात वारकऱ्यांसाठी भव्य वारकरी भवनाची वास्तू उभारण्याची संकल्पना शिवसेनेचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी स्वतः पुढाकार घेत राज्यातील वारकऱ्यांसाठी भव्य असे राज्यातील एकमेव वारकरी भवन रामनगर परिसरात उभारले आहे. सदर वास्तूचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याअनुशंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय आयुष्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार संजय गायकवाड उपस्थित राहणार आहे. याप्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून ह भ प संजय महाराज पाचपोर तसेच जगद्गुरु श्री संत महाराज यांचे वंशज ह भ प भानुदास महाराज मोरे, दत्त संस्थान धाराशिव येथील राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे, पंढरपूर येथील ह भ प प्रकाश महाराज जवंजाळ, नांदेड येथील दत्त संस्थानचे हभप सचिदानंद गुरु मधुबन महंत महाराज, माकोडी येथील सातबळेश्वर मंदिर संस्थांचे हभप श्रीहरी महाराज, देवाची आळंदी येथील ह भ प लक्ष्मण महाराज पाटील, नगर येथील संत मुक्ताई संस्थानचे हभप रवींद्र महाराज, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह भ प दामू अण्णा शिंगणे, विदर्भ वारकरी महामंडळाचे ह भ प राजेंद्र महाराज तळेकर, ह भ प वासुदेव शास्त्री महाराज, ह भ प रेणुका ताई जाधव, ह भ प जगदेवराव पवार, जेष्ठ वारकरी ह भ प कैलास महाराज गुरुजी आदी मान्यवरांना उपस्थिती लाभणार आहे.
सदर कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सकल वारकरी संप्रदाय बुलढाणा जिल्हा व आयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.