बुलडाण्याच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी – आमदार संजय गायकवाड

बुलडाण्याच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी – आमदार संजय गायकवाड

* केलेल्या विविध विकास कामांची दिली पत्रकार परिषदेत माहिती
बुलडाणा (प्रतिनिधी)
            महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात विकासकामे झाले, त्याबाबत आज १८ ऑक्टोबर रोजी आ. संजय गायकवाड यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालय मातोश्री येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली. तसेच प्रत्येक घटकांसाठी महामंडळाची निर्मिती करून त्यांना सक्षम करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहे. महायुती सरकारमध्ये लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे असंख्य महिला आज या योजनेचा लाभ घेत आहे. महिलांच्या नावावर गॅस असल्यास त्या महिलांना तीन गॅस मोफत दिले जात आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका अजोबा-आजी अशा विविध योजना सरकारच्या माध्यमातून राबिवल्या जात आहे. राज्यातील जनता मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेत आहे. बांधकाम कामगारांसाठी सुध्दा विविध योजना सरकार राबवित आहे. तर महायुती सरकारच्या काळात अनेकांना विविध योजनांच्या माध्यामातून घरे मिळाली, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
        पुढे बोलतांना म्हणाले की, बुलडाणा विधानसभा मतदार संघात मोठ्याप्रमाणात विकासाचे कामे झाली, काही प्रगतीपथावर आहेत. बुलडाणा शहरात विविध महापुरूषांचे स्मारके उभारण्यात आली. शहरातील विद्युत रोषणाईने शहरला सौंदर्य प्राप्त झाले आहे. अनेक रस्त्याची कामे करण्यात आली. त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय कृषी महाविद्यालय सुध्दा सुरू झाले आहे. अशाचप्रकारे बुलडाण्याच्या विकासाला पुढे घेऊन जाण्यासाठी जनतेने महायुतीला साथ द्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार संजय गायकवाड हे बुलडाणा विधानसभेसाठी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
      या महायुतीच्या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे, बुलडाणा भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. मोहन पवार, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष निलेश देठे, अॅड. सुनिल देशमुख, गजेंद्र दांदडे, डॉ. राजेश्वर उबरहंडे, सोहम झाल्टे, सिध्दार्थ शर्मा, अशिष व्यवहारे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *