जनतेच्या मनातील नेतृत्वाला महाविकास आघाडी संधी देणार का? 

जनतेच्या मनातील नेतृत्वाला महाविकास आघाडी संधी देणार का? 

* बुलडाणा विधानसभा : महायुतीला टक्कर देण्याची धमक जयश्रीताई शेळकेंकडे
* जनसामान्यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केल्या भावना
बुलडाणा 
       बुलडाणा विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली की, काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांचे नाव घेतल्याशिवाय चर्चाच पूर्ण होऊ शकत नाही. या महिला नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे, अशी भावना जनसामान्य व्यक्त करतात. सर्वात प्रभावी माध्यम सोशल मीडियावरील असंख्य समर्थकांडून भावी आमदार म्हणून त्यांचा उल्लेख बघायला मिळतोय. महायुतीला टक्कर देण्याची धमक केवळ जयश्रीताईंमध्येच असून त्याच परिवर्तन घडवू शकतात, असा सूर सध्या सर्वत्र ऐकायला मिळतोय. त्यामुळे जनतेच्या मनातील नेतृत्वाला महाविकास आघाडी संधी देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.  
 
       राज्यात विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला सुरुवात झालीय. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खरी लढत होईल. वंचित फॅक्टर यंदा फारसा प्रभावी ठरणार नसून तिसरी आघाडी सुद्धा काही भागातच परिणामकारक ठरेल, असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करतात. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच फायनल राहील. महायुतीकडून आ.संजय गायकवाड यांचे तिकीट कन्फर्म आहे. आता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार उभा करणार यावर सर्वकाही अवलंबून आहे. आघाडीत ही जागा उबाठाकडे आहे. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत लढण्यास सज्ज असून आपल्यालाच संधी मिळणार असा विश्वास त्यांना आहे. काँग्रेसकडून सुद्धा इच्छुकांची भली मोठी यादी आहे. 
      जयश्रीताई शेळके गेल्या दोन विधानसभांपासून पक्षाकडे उमेदवारी मागत आहेत. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. दांडगा जनसंपर्क आणि सामान्य नागरिकाशी जुळलेली नाळ त्यांची जमेची बाजू आहे. दिशा बचतगट फेडरेशनच्या माध्यमातून जयश्रीताईंनी जिल्हाभर बचतगटांचे जाळे विणले आहे. बचतगट चळवळीतून अनेक महिला उद्योजक समोर आल्या आहेत. आपल्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करुन महिलांनी स्वाभिमान जपला आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दीड हजार रुपये अनुदान सुरु केले. मात्र बचतगट चळवळीत काम करणारी महिला स्वतःच्या पायावर उभी आहे. बुलडाणा विधानसभा मतदार संघात १४६८८२ महिला मतदार आहेत. या महिला मतदारांना महाविकास आघाडीकडे आणण्याचे काम जयश्रीताई शेळके करु शकतात. 
 
        बुलडाणा मतदार संघातील गाव खेड्यातील, शहरातील प्रत्येक घरातील सदस्यापर्यंत जयश्रीताई शेळके पोहचल्या आहेत. जनतेच्या मनातील उमेदवार असूनही त्यांच्या कार्याची दखल अजूनही महाविकास आघाडी का घेत नाही, हा प्रश्न जनसामान्याच्या मनात आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खूप योजनांची कामे मार्गी लावली. दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून महिला बचत गटांना सक्षम बनविण्यासाठी तत्पर, अग्रेसर असतात. सोशल मीडियावर त्यांचे असंख्य समर्थक असून त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख मांडत प्रसिद्ध करीत असतात. आजच्या काळात सक्षम महिला नेतृत्व म्हणून जयश्रीताई शेळके विधानसभेत पोहचल्या पाहिजेत. एक स्त्री म्हणून त्या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहेत. मागील काही दिवसांपासून महिला, अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराबाबत जयश्रीताई शेळके नेहमीच आवाज उठवतात. त्यांच्यारूपात अभ्यासु, समाजशील, परखड व्यक्तिमत्व राजकारणात पुढे येणे काळाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *