महायुतीचे जिल्ह्यातील 3 जणांच्या उमेदवाऱ्या घोषित
उमेदवारांची यादी घोषित करण्यात आघाडी मात्र पिछाडीवर..
आघाडीच्या उमेदवारांची यादी आज घोषित होणार का..?
महायुतीतील भाजपाची पहिली यादी जाहीर झाली असून जिल्ह्यातील चिखली विधानसभा श्वेता महाले, खामगाव विधानसभा आकाश फुंडकर जळगाव जामोद विधानसभा या मतदार संघातील डॉ संजय कुटे यांची पहिल्याच यादीत उमेदवारी घोषित झाले आहे.
परंतु अद्यापही महाविकास आघाडी तील जिल्ह्यातील काँग्रेस ची उमेदवारी काही जाहीर झाली नसली तरी चिखली विधानसभेतून राहुल बोंद्रे, मलकापूर मधून राजेश एकडे, तर खामगाव मतदार संघातून दिलीप कुमार सानंदा तसेच जळगाव जामोद मतदारसंघातून प्रसन्नजीत पाटील यांची काँग्रेस कडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
परंतु अद्यापही महाविकास आघाडीतील उ बा ठा च्या वाट्याला आलेल्या बुलढाणा आणि मेहकर विधानसभेचे चित्र मात्र अद्यापही स्पष्ट झालेले दिसत नाही. मात्र *बुलढाणा विधानसभेत चिन्ह आमचं उमेदवार तुमचा अशी काहीशी परिस्थिती बघायला मिळू शकते*
तिकडे मलकापूर विधानसभेत माजी आमदार चैनसुख संचेती यांना भाजपाने उमेदवारी दिल्यास ते निश्चित पडतील असा घरचाच आहेर भाजपाचे शिवचंद्र तायडे यांनी दिला असल्याने मलकापूर मध्ये महायुतीचा उमेदवार कोण याकडेही लक्ष लागून आहे.
तसेच अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलेले डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर सिंदखेडराजा मतदारसंघातही चुरस बघायला मिळते यात महाविकास आघाडी तील ही जागा राष्ट्रवादी ला सुटली असून या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मागील कित्येक दिवसांपासून गायत्री शिंगणे ह्या देखील तयारी करत असून त्यांनी तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्याचं काम ही केलं त्या देखील उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं सांगितल्याने इथे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातेय या मतदारसंघावर महायुतीकडून भाजपाने देखील दावा केला आहे यामुळे ही जागा राष्ट्रवादी लढते का ही जागा भाजपाला सुटते याकडेही लक्ष लागून आहे.