उबाठाच्या दुसऱ्या यादीत जयश्रीताई शेळकेंचे नाव
* शिवसेनेची उमेदवारी मिळवणारी जिल्ह्यातील पहिली महिला
* बुलडाण्याच्या लढतीकडे राहणार सर्वांचे लक्ष
बुलडाणा
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने दुसऱ्या टप्प्यातील 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये चूरस निर्माण झालेल्या बुलडाणा विधानसभासाठी अखेर उबाठाकडून जयश्रीताई शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. इलेक्टिव्ह मेरिटनुसार महाविकास आघाडीने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी मिळवणाऱ्या जयश्रीताई ह्या पहिल्याच उमेदवार ठरल्यात.
उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या उमेदवार यादीत 65 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. आता आणखी 15 उमेदवार उभे करून पक्षाने एकूण 80 जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. बुलडाण्यातून जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांचे समर्थक आणि सर्वसामान्य जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.