डॉ शशिकांत खेडेकर मुंबईच्या दिशेने रवाना आज हातावर बांधणार घड्याळ..!
विधानसभा निवडणूक च्या अनुषंगाने राजकीय घडामोडी घडत असून बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभेसाठी महायुतिचा उमेदवार म्हणून माजी आ डॉ.शशिकांत खेडेकर हे आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित असल्याचं बोललं जातंय. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कडे एकमेव सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ आहे.
सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये सरळ सरळ दोन डॉ मध्ये लढत होणार असून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला कालच त्यांनी उमेदवारी अर्ज देखिल दाखल केला आहे. महायुतीमध्ये अनेक इच्छुक होते. परंतु माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी अजित दादा पवार यांचे भेट घेतली होती परंतु सिंदखेडराजा मतदार संघामध्ये जर डॉ राजेंद्र शिंगणे यांना टक्कर द्यायचे असेल तर त्या ठिकाणी तगडाच उमेदवार द्यावलागेल यासाठी पक्षश्रेष्ठीने चाचपणी करून पक्षप्रमुख अजित दादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांनी डॉ शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी मिळाल्यास डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यापुढे मोठे आवहण असणार आहे.