बुलढाणा: राजर्षी शाहू अभियंत्रिकी महाविद्यालय बुलढाणा व भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालया अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलढाणा यांच्या संयुक्तविद्यमाने “Diwali With MY Bharat “ या अंतर्गत दि. 24 ते 30 ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी शाहू अभियंत्रिकी महाविद्यालयाच्या प्रबंधक सौ कीर्ती प-हाड यांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता अभियान, शासकीय रुग्णालयात स्वयंसेवा इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून दि.27/10/2024 रोजी वाहतूक व्यवस्थापनाचा कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हा पोलिस अधिक्षक श्री विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधिक्षक श्री बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनानुसार सहा.पोलीस निरिक्षक श्री स्वप्नील नाईक यांनी वाहतूक व्यवस्थानाबाबत युवकांना सविस्तर माहीती दिली. तर बुलढाणा शहरातील स्टेट बँक चौक, जयस्तंभ चौक, संगम चौक, आडीबीआय बँक व तहसील चौकामध्ये श्रेणी पोलीस उपनिरिक्षक श्री कैलास कड यांनी युवकांना प्रत्याशीकासह प्रशिक्षण दिले. या प्रसंगी राजर्षी शाहू अभियंत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य बी. व्ही. नरवाडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री प्रमोद काटकर, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत, धनंजय चाफेकर, महेंद्र सोभागे, प्रा. अजिंक्य कुहीरे, प्रा. अजय पिंपळे, प्रा.हर्षल देशपांडे, प्रा.रुषिकेश भालेराव, व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी शुभम पोपळकर, ललीत काळे, राहूल पिंपळे, राहूल बोदडे यांनी परिश्रम घेतले.