जयश्रीताईंच्या विजयामुळे लोकशाहीचा विजय होईल- खा. मुकुल वासनिक*

जयश्रीताईंच्या विजयामुळे लोकशाहीचा विजय होईल- खा. मुकुल वासनिक

* विराट जनसभेत व्यक्त केला विश्वास : मविआच्या उमेदवार जयश्रीताई शेळकेंचा नामांकन अर्ज दाखल

बुलडाणा
जयश्रीताई शेळके यांचा विजय म्हणजे लोकशाहीचा विजय असून त्यांच्या विजयामुळे फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र उभारण्याचे काम होईल, असा विश्वास खासदार मुकुल वासनिक यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी २९ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर टिळक नाट्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर आयोजित विराट सभेला खा. वासनिक यांनी संबोधित केले. पुढे बोलतांना ते म्हणाले, या मतदार संघात हुकूमशाही वाढली असून सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना ५० हजारांच्या फरकाने पराभूत करा. याकरिता जयश्रीताईंच्या मशाल चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

* लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या असतील तर मशाल पेटवा- सुषमा अंधारे

बहिणीच्या नात्याची ज्यांना किंमत कळत नाही त्यांचा हिशोब चुकता करा. महायुतीच्या लोकांनी जाती-जातीत भांडणे लावली. गावगाडा उध्वस्त करण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. आमच्या लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या असतील, तर यावेळेला मशाल पेटवा, असे आवाहन उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी केले.

* माझी उमेदवारी सामान्य जनतेची- जयश्रीताई शेळके

बुलडाण्यात आपल्याला महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायचा आहे. माझी उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेची उमेदवारी आहे, असे प्रतिपादन करून उपस्थित जनसमुदयाचे जयश्रीताई शेळके यांनी आभार मानले. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या, मी स्त्री आहे म्हणून कमजोर समजू नका. महिषासुराला मारणारी चंडिका होती, हे ध्यानात ठेवा.!

* जयश्रीताईंचा विजय निश्चित- जालिंदर बुधवत
माझी जबाबदारी मतदार संघाची आहे. ताई, आम्ही रात्रंदिवस काम करू. या शिवसेनेत निवडून देणारे लोक आहेत, निवडून घेणारे नाहीत, मी तुम्हाला खात्री देतो, २५ हजाराच्या फरकाने जयश्रीताई निवडून येतील, असा विश्वास उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी यावेळी व्यक्त केला.

* जयश्रीताई शेळके ह्याच पुढच्या आमदार – राजेंद्र शिंगणे
येत्या २० तारखेला मतदान होत आहे. जयश्रीताई शेळके यांच्या रूपाने तिसरी महिला आमदार विधानसभेत जाणार आहे. गर्दी ओढून आणलेली नाही. सत्ता बदलण्याची ताकद असलेली ही गर्दी आहे. आता मतदारांनी ठरवलं आहे. जयश्रीताई ह्याच बुलडाण्याच्या पुढच्या आमदार असतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे वर्तवले. हजारो महिलांना रोजगार देण्याचे काम जयश्रीताईंनी केले आहे. सातत्याने मला खात्री आहे. ही आमची भगिनी आम्हाला विधानसभेत पोहचवायची असल्याचे त्यांनी सांगितले.

* ताई, तुम्ही विजयी होणारच ! – नरेंद्र खेडेकर

जयश्रीताई यांच्या नावातच जय असून त्यांचा विजय नक्की होणार आहे. सध्याचे महायुतीचे सरकार उलथून टाका. मशाल या चिन्हासमोरचे बटण दाबून जयश्रीताईना विजयी करा, असे प्रतिपादन नरेंद्र खेडकर यांनी केले.

* बदल घडवण्यासाठी एकत्र या- गणेशराव पाटील
बुलडाण्यात गुंडागर्दी सुरु आहे. गल्लीबोळामध्ये वरली मटक्याचे अड्डे आहेत. नशेचा बाजार सुरु आहे. आता आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. जीभ कापण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांना आम्ही आता सोडणार नाही, असा कडक इशारा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेशराव पाटील यांनी दिला.
यावेळी छगन मेहेत्रे, नरेश शेळके, डी.एस.लहाने आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचलन पत्रकार रणजितसिंग राजपूत यांनी तर आभार सुनील सपकाळ यांनी मानले.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *