महाविकास आघाडीतील अनेक इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे..
महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना पत्रकार परिषदेत दिले समर्थन…
आज शिवसेना (उबाठा) संपर्क कार्यालय, मेहकर येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद पार पडली. उमेदवारी अर्ज माघे घेण्याची आज शेवटची तारीख होती. अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज भरले होते, त्यात काही शिवसेना, काही काँग्रेस आणि काही अपक्ष उमेदवार होते. त्यामधून आज काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा. लक्ष्मण घुमरे आणि शिवसेनेचे जिल्हा संघटक मा. डॉ. गोपाल बछिरे यांनी पक्षाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. त्याचबरोबर मला पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापले मत व्यक्त केले. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारालाच आपण सर्वजण मिळून निवडून आणू आणि शिवसेनेच्या निष्ठावंत शिलेदाराला विजयी करण्यासाठी सर्वजण खांद्याला खांदा लावून काम करू असा शब्द यावेळी सर्वांनी दिला. सर्वांनी उपस्थित राहून महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना पाठिंबा आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे सरचिटणीस शामभाऊ उमाळकर, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे, काँग्रेसचे विधानसभा नेते ॲड. अनंत वानखेडे, डॉ. जानू मानकर, डॉ. सतीश ताजणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष देवानंद पवार, कृषी सभापती बुलढाणा नंदूभाऊ बोरे, निंबाजी पांडव, मेकर शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे, मुरलीधर गवई, मा. नगराध्यक्ष अशोक अडेलकर, दत्ताभाऊ घनवर, प्रकाशभाऊ अंभोरे, युवासेना तालुकाप्रमुख ॲड. आकाश घोडे, ॲड. संदीप गवई आणि वामन गवई उपस्थित होती.