मेहकर मतदार संघ शिवसेनेचाच आहे विशाल मतांनी मशालीला निवडून द्या उध्दव ठाकरे
सिद्धार्थ खरात यांच्यासाठी एकवटली जनता
मेहकर दि ८ मेहकर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) अर्थात माझा आहे सातत्याने आपण या मतदारसंघात विजयी होत आलो आहे आता सुद्धा आपण विशाल मतांनी मशालीला निवडून द्या असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोणार येथील विराट सभेत केले आहे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या प्रचारार्थ आज लोणार येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विराट जाहीर सभा झाली यावेळी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले आहे आपल्या घणाघाती भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की येत्या 23 तारखेला आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे चुकून महायुतीचे सरकार आले तर सर्वांचेच दिवाळी निघणार आहे. कोरोना काळात मी घरी राहून महाराष्ट्र सांभाळला. मात्र तुम्ही महाराष्ट्रात फिरून घरे फोडता. तुम्हाला कोण पाहिजे? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना करून विचारले की घर सांभाळणारे की घर फोडणारे. मेहकर आपला मतदार संघ आहे शिवसेना आपली आहे मी निवडणूक आयोगाचा निर्णय मानत नाही महाराष्ट्रात 40 दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या आपल्या पक्षावर दरोडा टाकला त्यांना मत द्या असे सांगण्यासाठी पंतप्रधान गृहमंत्री येतात पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणतात की महाविकास आघाडीच्या गाडीला चाके नाहीत. मी असे म्हणतो की तुमच्या महायुतीच्या डबल इंजिनला भ्रष्टाचाराची चाके लागली ती आम्हीच पंचर करणार आहोत. अजित पवार गटाचे नवाब मलिक जर गुन्हेगार असतील तर मोदी व फडणवीस यांना कसे चालतात? खरे काय आहे? मोदीजी तुमच्या बुडाखाली काय आहे ते बघा मग महाविकास आघाडीची चिंता करा .माझा पक्ष, चिन्ह चोरले. वडिलांचे नाव चोरले तरीसुद्धा प्रत्येक पोस्टरवर हिंदू हृदय सम्राटांचे नाव आहे .ज्या बाळासाहेब ठाकरे मुळे मोदीजी तुम्ही या पदावर बसलात त्यांचा पक्ष तुम्ही आता संपवायला निघाले आहात .मी शेतकरी नाही पण मला शेतकऱ्यांचे दुःख कळतात. तेवढी माणुसकी माझ्याजवळ आहे. मी मुख्यमंत्री असताना दोन लाख पर्यंत कर्जमुक्ती केली होती दुर्दैवाने सरकार यांनी पाडले. जे शक्य होते ते मी केले माझा पक्ष फोडला .अख्खा महाराष्ट्र गुजरातच्या चरणी नेत आहेत म्हणून मी मैदानात उतरलो आहे आपले सरकार असताना एक तरी उद्योग गुजरातकडे गेला नव्हता लॉकडाऊन मध्ये सुद्धा आपण करार करत होतो. मोठे उद्योग आणले. ज्या विदर्भाने फडणवीस यांना मोठे केले त्या विदर्भात येणारे उद्योग सुद्धा गुजरातला नेले. ज्यांना भाव द्यायचा नाही त्यांना भाव देऊ नका त्यांना खाली पाडा या निवडणुकीत गद्दाराचे शेपूट सुद्धा ठेवायचे नाही. मेहकर मतदार संघात आपण पंधरा वर्षापासून ज्याला शेंदूर लावला तो धोंडा निघाला त्याला परत आणायचे नाही .एक गद्दार झाला म्हणून तुम्ही सर्व गद्दार नाही विधानसभेत तुमच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणारा योग्य माणूस तुम्हाला दिला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू करणे, अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवून देणे, 25 लाख रुपये पर्यंतचे मोफत आरोग्य उपचार करणे अशा अनेक योजना शिवसेनेच्या वचन नाम्यात आहे. तुम्ही मला कुटुंबप्रमुख मानतात. ती जबाबदारी मी घेतो गद्दारांच्या भूलथापाला बळी पडू नका अडीच वर्षात त्यांनी खूप कमावलं विदर्भात एकही महायुतीचा उमेदवार निवडून येऊ देऊ नका तुम्ही सोन्यासारखी माणसे आहात आज मी शून्य असलो तरी तुम्ही माझी ताकद सोबत आहे जळी स्थळी विरोधकांना सर्वत्र उद्धव ठाकरे दिसतात आपलं हे घट्ट नातं असंच ठेवा येत्या 23 तारखेला मेहकर मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विशाल फरकाने विजय होणार आहे असाही विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात म्हणाले की मी मोठ्या फरकाने विजयी होणार आहे सध्याच्या आमदाराने 15 वर्षात काहीच केले नाही तरीसुद्धा तुम्ही त्यांना निवडून दिले पण आता तुमची चूक सुधारा व मला मोठ्या फरकाने विजयी करा. यावेळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,सुबोध सावजी, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर, शिवसेना जिल्हा संघटक गोपाल बछिरे,उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे,माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे, माजी सभापती नंदकिशोर बोरे,काँग्रेसचे विधानसभा नेते अँड.अनंतराव वानखेडे,महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांची भाषणे झाली. संचालन अजीम नवाज राही यांनी केले. यावेळी मंचावर तेजस ठाकरे, पश्चिम विदर्भ प्रमुख खा.अरविंद सावंत, आ.मिलिंद नार्वेकर, संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्क प्रमुख छगन मेहेत्रे,महिला आघाडी जिल्हा संघटक विजया पाटील खडसान,महिला आघाडी जिल्हा प्रमुख जिजा राठोड,युवा सेना जिल्हा अधिकारी नंदु कराडे,उपजिल्हा प्रमुख प्रा.आशिष रहाटे,विधानसभा संघटक किसन पाटील, किसान सेना उपजिल्हा प्रमुख एन.ए.बळी,तालुका प्रमुख निंबाजी पांडव,लोणार तालुका प्रमुख अँड.दीपक मापारी,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवानंद पवार, शहर अध्यक्ष पंकज हजारी,माजी सभापती सतिष ताजने,माजी नगरसेवक डी.जी.गायकवाड, शहर प्रमुख किशोर गारोळे, लोणार शहर प्रमुख गजानन जाधव,युवा सेना तालुका अधिकारी आकाश घोडे, शहर अधिकारी ऋषी जगताप, रा.काँ.तालुका अध्यक्ष दत्ता घनवट,माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, राजेश अंभोरे, माजी नगरसेवक शैलेश बावस्कर, संदीप गारोळे,अँड.संदीप गवई,स्वप्नील गाभणे,साहेबराव पाटोळे,संजय ठाकरे, विनोद नरवाडे, संजय म्हस्के,माजी जि.प.सदस्य संजय वडतकर सह शिवसेना, काँग्रेस,रा.काँ.चे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.