*विधवा महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ करणार म्हणजे करणार …*
*जयश्रीताईंचा दुर्दम्य आत्मविश्वास!*
*उद्धव ठाकरे यांच्यासमोर एकल महिलांच्या प्रश्नांना फोडली वाचा!*
*बुलढाणा*
*शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे बुलढाणा येथे प्रचार सभेसाठी आले होते. दरम्यान विधवा महिलांच्या प्रश्नांना सभेत अग्रस्थानी आणीत (उबाठा)च्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी विधवा महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ व त्यांच्या स्वावलंबनाचा मुद्दा प्राकर्षाने मांडला. तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहा.. मी एक महिला आहे.महिलांचे दुःख, अडचणी मी जाणून आहे.आमचे सरकार आल्यास एकल महिलांना हवे असणारे आर्थिक विकास महामंडळ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करेल असे त्या म्हणाल्या. त्यामुळे बुलढाण्यातून सुरू झालेल्या विधवा विवाह, एकल महिलांच्या चळवळीला नक्कीच बळ मिळाले आहे.*
*बुलढाणा येथे मानस फाउंडेशन च्या माध्यमातून प्रा. डी एस लहाने यांनी विधवा व एकल महिलांसाठी कार्य सुरू केले आहे. या कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली. बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी जयश्रीताई शेळके महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. सामाजिक चळवळीतून आलेल्या जयश्रीताईंना महिलांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे विधवा व एकल महिलांचा मुद्दा त्यांनी विचार पिठावर मांडला. विधवा महिलांचे प्रश्न, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावर फारसं बोलल्या जात नाही. पतीच्या निधनानंतर त्यांना उपेक्षित जीवन जगावे लागते.बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विधवा महिलांची संख्या प्रचंड मोठी आहे. मात्र कुठल्याही राजकीय व्यक्तीने आजवर यावर भाष्य केले नाही. चार-पाच वर्षापासून बुलढाण्यातून कार्य केले जाते मात्र राजकीय पाठबळ मिळालेले नाही. प्रथमच त्यांच्या प्रश्नांची जाण ठेवून जयश्रीताई बोलल्या. त्यामुळे विधवा व एकल महिलांच्या आशा पल्लवी झाल्या आहे.जयश्रीताईंनी केलेले वक्तव्य हे काही चार चौघातील वक्तव्य नाही तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्या बोलल्या. उद्धव ठाकरे हे राज्याचे दिग्गज नेते आहे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यास ठाकरे यांचा शब्द अर्थातच ‘हेवी वेट ‘ असेल. त्यामुळे जयश्रीताईंनी केलेले वक्तव्य हे बुलढाणा मतदारसंघापूरते मर्यादित नाही तर राज्यातील विधवा व एकल महिलांसाठी देखील आशादायी मानले जात आहे. जयश्रीताई यांनी हा मुद्दा अग्रक्रमाने हाती घेतल्याबद्दल प्राध्यापक डी एस लहाने व मानस फाउंडेशनने समाधान व्यक्त केले आहे.*