सत्यशोधक आणि महापरिनिर्वाणने जागविली सामाजिक अस्मिता!
बुलढाणा,
महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर आणण्याचे काम जयश्रीताई शेळके व सुनील शेळके यांच्या माध्यमातून झाले. त्याचबरोबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील चित्रपट ‘महापरिनिर्वाण’ समतेचा विचार जागवणारा ठरला. दोन्ही महापुरुषांच्या इतिहासाच्या आठवणी जागवण्याचे काम शेळके दांपत्यांनी केल्याने ते महापुरुषांच्या विचाराचे वैचारिक वारसदार ठरलेत. त्यांना फुले आंबेडकर अनुयायांची पहिली पसंती मिळत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांच्या शिदोरीवर महाराष्ट्राच्या समाजमनाचे पोषण झाले आहे. त्यांचा आदर्श घेत जयश्री शेळके यांच्या कुटुंबाने फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा आणि वसा समर्थपणे जोपासला आहे. आज बुलढाणा विधानसभा निवडणुकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांना समाज जोडणाऱ्या या उपक्रमांचा चांगलाच फायदा होत आहे.
‘सत्यशोधक’ आणि ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाने समाजात एक अस्मिता जागविली असून त्या समाजहिताच्या पेरणीचे फळ जयश्री शेळके यांना मतदानरुपी आशीर्वाद देऊन बुलढाणा विधानसभेची जनता त्यांना विधानसभेत पाठवतीलच असे चित्र बघायला मिळतेय.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार जयश्री शेळके यांच्या गावभेटी आणि प्रचार दौरे सातत्याने सुरू आहेत. या दौऱ्यामध्ये नागरिकांकडून जयश्री शेळके यांच्या कामाचे कौतूकच होत आहे. जयश्री शेळके यांनी आतापर्यंत केलेल्या समाजहिताच्या उपक्रमांचा त्यांना निश्चित फायदा होईल, अशी लोकभावना आहे. जयश्री शेळके यांचे उपक्रमही तसे फुले, शाहू, आंबेडकर विचारांची समाजात पेरणी करणारे आणि आदर्श असेच आहेत. नव्या पिढीला फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा समजावा, त्यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने जयश्री शेळके आणि त्यांचे पती सुनिल शेळके यांनी आतापर्यंत कार्य केले. ‘सत्यशोधक’ आणि ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटाने तर त्यांचे लोकप्रियता सर्वत्र झाली.
जयश्री शेळके यांच्यापाठिशी ‘सत्यशोधक’ आशिर्वाद
5 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झालेला ‘सत्यशोधक’ नावाचा जोतिराव फुले यांच्यावरील मराठी चित्रपट. जर आपण लोकप्रिय श्रवणानुसार पाहिले तर, चित्रपटाला जनतेने आणि समीक्षकांनी समान मान्यता दिली आहे. शेतकरी आणि कामगारांच्या दैनंदिन जीवनावर आधारीत या चित्रपटाने सर्वांनाच आकर्षीत केले. या चित्रपटाच्या माध्यमातून सत्यशोधक सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत झाली. विचारांची पेरणी करण्यास अधीक सोपे झाले. या चित्रपटाच्या माध्यमातून जयश्री शेळके यांचे विचारही समाजासमोर आले. आज एक महिला म्हणून जयश्री शेळके यांचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील हे धाडस खूप मोठे आहे.त्यांच्याकडे जयश्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे माता रमाई,अहिल्याबाई,जिजाऊंचे विचार आहेत. त्यामुळे जयश्री शेळके यांच्यापाठिशी ‘सत्यशोधक’ आशिर्वाद आहेत.
जयश्री शेळके यांचे विचार सर्वसामान्यांच्या हिताचे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घडलेल्या गुंतागुंतीच्या भावना व घटनांचा उलगडा करणाऱ्या महापरिनिर्वाण चित्रपटही शेळके यांनी काढला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या महापरिनिर्वाणाशी संबंधीत गोष्टी सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इतिहासाची नव्याने माहिती तरुण पिढी व समाजासमोर आली आहे. महात्मा फुले व बाबासाहेबांना आदर्श मानणाऱ्या जयश्री ताईंना म्हणूनच समाजानेही प्रथम क्रमांकाची पसंती दर्शवली आहे.