निवडणूक विषयक कामात कसूर; मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल
बुलढाणा, दि.21 (जिमाका): मतदान साहित्य वाटपाच्या वेळी अनुपस्थित राहून कामात कसून केल्या प्रकरणी नांद्राकोळी येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापकाविरूद्ध पोलीस स्टेशन, बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारसीनुसार तक्रार दाखल केली आहे..
निवडणूकविषयक कामकाजासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करुन दि. 19 नोव्हेंबर रोजी मतदानाचे साहित्य वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी उच्च प्राथमिक शाळा नांद्राकोळी येथील मुख्याध्यापक मतदानाचे साहित्य वाटप होत असलेल्या ठिकाणी मतदान केंद्राचे साहित्य घेण्यास अनुपस्थित होते. ही बाब निवडणूक कामकाजात अळथळा निर्माण केला असून लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कर्तव्यात कसूर केला आहे. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या शिफारसीनुसार मुख्याध्यापक यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन बुलढाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बाब जिल्हा परिषदचे जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील कलम 3 चा भंग केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सदर मुख्यध्यापकास नियम 1967 मधील कलम 3 तरतूदीनुसार निलंबनाचा आदेश पारित केला आहे. निलंबन कालावधी त्यांचे मुख्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांचे कार्यालयाकडून प्राप्त आदेशाप्रमाणे मुख्यालय राहील, अशी माहिती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे.