बातमी

*25 फेब्रुवारीला शेगाव येथे “राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा..*

*राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन...केंद्रिय आयुषमंत्री प्रताराव जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती*

  • *25 फेब्रुवारीला शेगाव येथे “राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा..*
    *राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन…केंद्रिय आयुषमंत्री प्रताराव जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती*

शेगाव ( प्रतिनीधी )
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगांव येथे “राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. या आरोगय
मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार आहे .अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.
केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव पुढे म्हणाले की आयुष विभागाच्या वतीने हा आरोग्य मेळावा संत गजानन महाराजांच्या नगरीमध्ये होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल श्री.आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.मकरंदआबा पाटील, सह पालकमंत्री श्री.संजय सावकारे, राज्याचे कामगारमंत्री श्री.आकाश फुंडकर, आ.डॉ.संजय कुटे, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ट्रस्टचे अध्यक्ष पद्मश्री पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा तसेच आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रोफेसर राकेश शर्मा यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. आयुष मंत्रालयाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्वेद महासंम्मेलनाला देण्यात आली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन ही महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर येथे १९०७ साली स्थापन झालेली आयुर्वेदाची सर्वात मोठी व जुनी संघटना आहे जी संपूर्ण देशभर कार्यरत आहे. सदर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजन समिती स्थापन करण्यात आली असून आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता यांना आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. आयुर्वेद महासंम्मेलनाने यापूर्वी २२ राज्यस्तरीय आरोग्य तसेच ३ राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य मेळावे त्यांनी यशस्वीपणे आयोजित केले आहेत.
या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आयुष चिकित्सा पद्धतींचा म्हणजेच आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योगाचा प्रचार प्रसार व्हावा या दृष्टीकोनातुन केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळाव्यात चारही दिवस नागरिकांची व रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन देखील विविध तज्ञ व्याख्यानांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या मेळाव्याचा फायदा बुलढाणा जिल्हा व परिसरातील शेतकऱ्यांना देखील होणार असून या मेळाव्यात वन औषधी लागवड, संदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना आपल्या शेतात वन औषधी लागवडीसाठी होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
या आरोग्य मेळाव्यात देशभरातील अनेक आयुष औषध निर्माता कंपनी सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचा अवलंब ते कशा पद्धतीने करीत आहेत, सोबतच आयुर्वेदामध्ये चाललेले नवीन नवीन संशोधन याबद्दलची माहिती देखील दिली जाणार आहे. आयुष औषधी निर्माता वर्गासाठी देखील वेगवेगळ्या कार्यशाळांचे आयोजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या ठिकाणी वनऔषधी प्रदर्शनाच्या माध्यमातून सामान्य लोकांना आपल्या जवळपास सापडणाऱ्या वन औषधीच्या साहाय्याने सोपा आणि माफक दरात उपचार कशा पद्धतीने केले जाऊ शकतता याची देखील माहिती या ठिकाणी मेळाव्यात दिली जाणार आहे.
आपण आयुष मंत्री म्हणुन कार्यभार स्वीकारल्यानंतर अभिनव पद्धतीने आयुष मंत्रालयाचे कामकाज पुढे नेण्याचा सातत्याने काम करत आहोत. यातील प्रमुख बाबी म्हणजे, देश का प्रकृति परीक्षण अभियान, २९ ऑक्टोबर २०२४ रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची घोषणा केली. या अभियानात १.३९ कोटी लोकांनी सहभाग घेतला आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये ५ गिनीज विश्वविक्रम नोंदवले गेले.
त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेसोबत (WHO) मिळून पारंपारिक औषधोपचारांवरील दुसरी जागतिक शिखर परिषद डिसेंबर २०२५ मध्ये दिल्लीत संपन्न झाली. यामध्ये १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते, २५ हून अधिक देशांचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ आले होते आणि १८ देशांसोबत द्विपक्षीय बैठका (Bilateral Meetings) पार पडल्या. जून २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ५ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे 3 लाखांहून अधिक लोकांनी एकत्र योगाभ्यास केला. ऑक्टोबर 2024 मध्ये, आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते AIIA, दिल्ली येथे ‘आयुष औषधी केंद्राचे’ उद्घाटन करण्यात आले. आता आयुष मंत्रालयाच्या सर्व संस्थांमध्ये आम्ही आयुष औषधी केंद्रे सुरू करणार आहोत ही आयुष औषधी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आमची योजना आहे. सध्या आयुष्मान भारत योजनेत आयुष पॅकेजेसचा समावेश करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आपल्या मंत्रीपदाचा फायदा सर्वसामान्य जनतेलाही व्हावा. या दृष्टीकोनातुन आयुष आरोग्य मेळावा आपल्या जिल्हयात अखिल भारतील आयुर्वेद महासंम्मेलनाच्या माध्यमातुन घेत आहोत. या मेळाव्याचा लाभ नागरीकांनी घ्यावा असे आवाहन केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला कामगारमंत्री आकाश फुंडकर बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटीलआयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ.आशुतोष गुप्ता कार्यकारी अधिकारी अवधेश कुमार श्रीवास्तव
उपस्थित होते

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button