राजकिय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रा. डी. एस. लहाने यांच्याकडे बुलडाणा विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
बुलडाणा जिल्हा मुख्यालयी प्रा.डी. एस. लहाने हे शैक्षणिक, बँकिंग, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक संस्था संघटनांशी त्यांचा सबंध आहे. तालुकाध्यक्ष असताना त्यांनी तलुकाभर राबवलेली घोंगडी बैठक कार्यक्रम, महापुरुषाच्या सन्मानार्थ राबवलेले सन्मान यात्रा कार्यक्रमाची दखल राज्यस्तर घेण्यात आली व सर्व नेत्यांनी त्यांचे कौतुक केले होते. विधवा घटस्फोटीत महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी घेतलेली विधवा परिषद राज्यभर गाजली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासून ते डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून सातत्यपूर्ण योगदान देत आहे. याची दखल घेत पक्षाचे नेते अजित दादा पवार यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी यांनी बुलडाणा विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.