आयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सर्व देशभरात भक्तीमय वातावरण तयार झालेले असुन चिखली तालुक्यातील धोत्रा भणगोजी येथेही अगदी सकाळपासुनच गावकरी व बंकटस्वामी भजनी मंडळाच्या वतीने गावात सकाळ पासुनच काकड आरती व टाळ मृदगाच्या गजरात ९ वाजता रेणुका मातेच्या मंदिरापासुन दिंडीला सुरूवात करून संपूर्ण गावात परिक्रमा केले. या दरम्यान गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी दिंडी सोहळ्याच्या सुरूवातीला सौ. प्रमिला अरुण भोसले, सौ. आश्विनी सुनिल भोसले यांनी सर्व उपस्थितांना कुंकू अक्षता लावून कार्यक्रमास सुरूवात झाली. या निघालेल्या दिंडी सोहळ्यात गावातील महिला, पुरुष, लहान मुले तसेच वृध्दांचीही उपस्थिती होती. गावात महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळी व घरावर झंडे फडकवून भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. रेणुका मातेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर सायंकाळी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले.यावेळी कार्यक्रमास ह.भ.प. रामकृष्ण महाराज शितोळे, ह.भ.प. अशोक महाराज पवळ, वाल्मीक महाराज कोईगडे, ज्ञानेश्वर कोईगडे, अशोक शिंदे, ज्ञानेश्वर हळदे, रामकृष्ण कापसे, विश्वंभर हळदे, निवृत्ती हळदे, पुरूषोत्तम काटे यांच्यासह आदी रामभक्त यांनी सहकार्य केले.