क्रांतिसूर्य महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या कार्याला बुलढाणेकरांनी अनोखी मानवंदना दिली. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रविवारी रात्री साडेआठ वाजता कँडल मार्च काढण्यात आला.
क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट एकाचवेळी राज्यातील १५० हुन अधिक चित्रपटगृहात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला. तेंव्हा पासून बुलडाणा शहरातील एआरडी सिनेमॉल येथे हा चित्रपट हाऊसफुल्ल सुरु आहे. बुलढाणेकरांनी रविवारी २१ जानेवारी २०२४ रोजी रात्री महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करुन एआरडी सिनेमॉलपर्यंत कँडल मार्च काढून क्रांतिसूर्याला अनोखी मानवंदना दिली.
रात्री ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करण्यात आली होती. हाती क्रांतीची मशाल आणि मेणबत्ती घेऊन महिलांनी सहभाग घेतला.