मुफ्ती सलमान अझहरीची तात्काळ सुटका करा
* एमआयएमचे जिल्हाधिकारी मार्फत केंद्रीय गृह मंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी
मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात एटीएसने कथित आरोपाखाली ताब्यात घेतले आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ सुटका करावी, या मागणीसाठी मंगळवार 6 फेब्रुवारी 2024 रोजी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोबीन खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
दिलेल्या निवेदनात नमूद की, मुफ्ती सलमान अझहरी यांना नुकतेच गुजरात एटीएसने मुंबई येथून एका निराधार आणि कथित आरोपात ताब्यात घेतले आहे. मुफ्ती साहेबांची देशात आणि जगात एक वेगळी ओळख आहे. त्यांची भाषणे ऐकून अनेक तरुण अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर झाले आहेत. देशभरातील मोठ्या मुस्लिम धर्मगुरूंच्या यादीत मुफ्ती सलमान अझहरी यांचे नाव आघाडीवर आहेत. अशा स्थितीत त्यांना एटीएसने ताब्यात घेतल्याने मुस्लिम समाज आणि मुस्लिम जगात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुफ्ती साहेबांच्या तात्काळ सुटकेसाठी देशभरात अर्ज, निदर्शने, आंदोलने आदींच्या माध्यमातून मागणी होत आहे. याच पार्श्वभुमीवर एमआयएमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. निदेदन देतेवेळी मीर वसीम रजा, सलमान रजा, अमीरूददीन रजा, शेख सोहेल, अकरम शेख, मोहसीन भाई, मो.अबुजर, अरबाज शेख, नवेद पठान, बबलु काझी, शेख साबिर शेख रहीम, इम्रान शेख, मो.आकिब, सैयद अनैद, इरफान खान, सैयद तसलीम, शेख रफिक, कैफ खालिक, माज कुरेशी, शेख रशीद, राहील शेख, जुनेद बेग, जुबेर पठान, मो.शहेबाज, शाहरूख खान आदि मोठ्या संख्याने मुस्लिम युवक उपस्थित होते.