परिवर्तन रथयात्रा २२ तारखेपासून संग्रामपूर तालुक्यात !

परिवर्तन रथयात्रा २२ तारखेपासून संग्रामपूर तालुक्यात !

* वन बुलढाणा मिशन तीन दिवसांत ७० गावांत करणार परिवर्तनाचा जागर
बुलडाणा 
      उत्कृष्ट नियोजन आणि विकासात्मक दृष्टीकोनासाठी ओळखले जाणारे ‘वन बुलडाणा मिशन’चे संकल्पक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली परिवर्तन रथयात्रा २२ फेब्रुवारीपासून संग्रामपूर तालुक्यात विकासाचा घोष अन परिवर्तनाचा जागर करणार आहे. चार दिवसांत तब्बल ७० गावांमध्ये ही परिवर्तन रथयात्रा पोहचणार आहे. जनतेशी संवाद साधून संदिप शेळके या भागातील समस्या जाणून घेणार आहेत.
 
       मोताळा तालुक्यातील नळकुंड येथून १० फेब्रुवारी रोजी परिवर्तन रथयात्रेला सुरुवात झाली. तीन दिवस संपूर्ण मोताळा तालुक्यात परिवर्तन रथयात्रेचा जागर बघायला मिळाला. सर्वच गावांत भरभरुन प्रतिसाद मिळाला. १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी परिवर्तन रथयात्रेने मोताळा तालुक्याचा निरोप घेतला. जिल्ह्याच्या विकासाची तळमळ, व्हिजन व आक्रमकतेचे दर्शन घडवत संदीप शेळके यांनी जनतेला साद घातली. या युवा नेत्याचे गावोगावी जल्लोषात स्वागत झाले. कोणत्याच राजकीय नेत्याने आजपर्यंत मांडल्या नाही अशा संकल्पना संदीप शेळके मांडत असल्याने जनतेतून त्यांना भक्कम पाठींबा आणि आशीर्वाद मिळत आहेत.  
 
* संदीप शेळके साधणार संग्रामपूरवासीयांशी साधणार संवाद : 
        येत्या २२ फेब्रुवारीपासून संदीप शेळके परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यात आहेत. चार दिवसांत ते तब्बल ७० गावात जाणार आहेत. संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी सर्वात आधी संदीप शेळके पूरग्रस्त गावात पोहचले होते. त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक मदत व साहित्य वाटप केले होते. वन बुलडाणा मिशनच्या स्वयंसेवकांनी तत्काळ मदतकार्य सुरु केले होते. आता परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून संदिप शेळके संग्रामपूर वासीयांशी संवाद साधणार आहेत. 
 
* पहिल्या दिवशी या गावांत होणार परिवर्तनाचा जागर : 
 
       परिवर्तन रथयात्रा २२, २३, २४, २५ फेब्रुवारी असे चार दिवस संग्रामपूर तालुक्यात परिवर्तनाचा जागर करणार आहे. या भागातील विविध समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता राजपूर येथून परिवर्तन रथयात्रेस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अकोली, चांगेफळ बु. चांगेफळ खुर्द, निवाना, निरोड, धामणगाव, मारोड, करमोडा, लाडनापूर, टूनकी, वसाली, सोनाळा, पलसोडा आणि बावनबीर येथे सभा होणार आहेत. संदीप शेळके विकासाचे व्हीजन जनतेसमोर मांडणार आहेत.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *