बुलडाणा, दि. २५ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्रिटिकल ब्लॉक कक्षाचे भूमिपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. त्यानिमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यक्रम पार पडला.
यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात, तहसीलदार आनंता पाटील, डॉ. फडणीस, डॉ. शर्मा, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, क्षयरोग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी आदी उपस्थित होते.
आहार तज्ज्ञ साहेबराव सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले.
बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात 23 कोटी 75 लाख रुपये खर्चून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 50 बेडचे क्रिटिकल ब्लॉक बांधण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये आयसीयूची स्थापना करण्यात येत आहे. याठिकाणी अत्याधुनिक सोयींनी युक्त हॉस्पिटल उभारले जाईल. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा विशेष फायदा होणार आहे.
0000