जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीची गाजत असलेली परिवर्तन रथयात्रा खामगाव येथे आली होती त्यादरम्यान महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता..खामगाव तालुक्यातील ८० गावांत ही रथयात्रा पोहचणार असून रथयात्रेची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या गुरुद्वारा हॉल, काँग्रेस भवन येथे हा महिला मेळावा घेऊन सुरुवात करण्यात आली..
जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक दूर करण्यासाठी संदीप शेळके यांनी वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीची सुरुवात केली. आगामी लोकसभा निवडणुकीत राजकीय परिवर्तन करण्यासाठी संदीप शेळके यांनी कंबर कसली आहे. १० फेब्रुवारीपासून मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून परिवर्तन रथयात्रा सुरू केली. गेल्या १९ दिवसांत मोताळा, शेगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील गावोगावी पोहचून संदीप शेळके यांनी परिवर्तनाची साद घातली. तिन्ही तालुक्यांत या यात्रेचे दमदार स्वागत होत आहे…