माँसाहेब जिजाऊ, माता सावित्री व माता रमाईच्या या बुलढाणा जिल्ह्यातील लेकीला दिल्लीत नेतृत्व करण्याची संधी मिळणार का..?
देशभरात लोकसभेचे वारे वाहू लागले आहे महायुती,महाआघाडी महाराष्ट्रात तर देशात एनडीए इंडिया गटबंधन देशात एकत्रित येऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी ला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय नेत्यांच्या बैठका वाढल्या असून राज्यातिल लोकसभेच्या 48 जागेसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे.
यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून प्रत्येक पक्ष जिल्ह्यातील 48 लोकसभेच्या जागेवर आपला दावा करीत आहे.
यातच बुलढाणा जिल्हा मातृतिर्थ जिल्ह्याच्या नावाने ओळखला जातो राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजामुळे बुलढाणा जिल्ह्याची ओळख ही मातृतीर्थ जिल्ह्याच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते भारताने राज्यघटना स्वीकारल्या पासून झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत बुलढाणा लोकसभेवर एकही महिला उमेदवाराला पक्षाची उमेदवारी मिळाली नाही
राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांनो सोबत घेऊन स्वराज्य उभारले
ज्या मासाहेब जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे झाला तसेच स्त्री-पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे यादेखील बुलढाणा येथीलच होत्या अशा कर्तबगार महिला आपल्या बुलढाणा जिल्ह्यात होऊन गेल्या परंतु भारताला स्वतंत्र मिळाल्यापासून आतापर्यंत एकही महिला महिलेला कुठल्याच राजकीय पक्षाने त्यांच्या पक्षाची लोकसभेची उमेदवारी देखील देऊ इच्छिले नाही.
याचा अर्थ असा नाही की जिल्ह्यात आदर्श नेतृत्व करणाऱ्या महिला नाहीत
परंतु महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे नेते यांची पत्नी, मुलगी,सून अशांना घरातील लोकांनाच उमेदवारी मिळावी यासाठी सदैव प्रयत्नरत असतात परंतु बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय असा बडा नेताच झाला नाही का.? ज्यांचं राज्याच्या राजकारणात ज्यांची पकड असेल… महिला आमदार, जिल्हा परिषद सदस्य,सरपंच, नगराध्यक्ष झाल्यात परंतु महिलांना दिल्लीमध्ये नेतृत्व करण्यासाठी कुठल्याच पक्षांने संधी न देणे हे देखील तेवढाच लाजिरवाणा आहे.
सर्वेच पक्ष स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतात परंतु महिलांना संधी द्यायची असली तर हेच बडे नेते वेळ आली तर ( जागा आरक्षित झाली तेव्हा )आपल्याच घरातील पत्नी,मुलगी,सून यांनाच उमेदवारी देत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे
बुलढाणा जिल्ह्यात कर्तबगार महिलांची कमी नाही या जिल्ह्यात विद्यमान आमदार श्वेता महाले ह्या चिखली विधानसभेच्या आमदार असून तेथे विविध विकासकामे त्यांच्या माध्यमातून होत आहेत
माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी सर्वप्रथम विधानसभेत राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यात यावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी तत्कालीन काळात उमटवलेला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्रीताई शेळके यांची दिशा महिला बचत गट फेडरेशन जिल्हाभरात पसरलेला असून त्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना स्वयंरोजगारासाठी बचत गटाच्या माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. व महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम अविरतपणे सुरु आहे.
जिल्हाभरातील बचत गटाच्या माध्यमातून जवळपास 50 हजाराहून अधिक महिला त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत.
यांच्यासारख्या कार्य कर्तुत्ववान माँसाहेब जिजाऊ, माता सावित्री, माता रमाईच्या या लेकींना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष, व महायुती,आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मिळेल का..? असा प्रश्न उपस्थित होत असून अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.