लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन… विनोद पवार
महान सम्राट अशोकांनी बांधलेल्या ८४हजार स्तूपापैकी एक स्तूप संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावी उतखंनात सापडला, प्राचीन बौद्ध स्तूप या स्तूपाचे संवर्धन व्हावे या करिता केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक विशाल महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय कॉलेजच्या प्रांगणातून या मोर्चाचे नेतृत्व मा. वामन मेश्राम व प्रा. डॉ. विलास खरात हे करणार आहे बुलढाणा हा जिल्हा विविधतेने व सांस्कृतिक वारसांनी नटलेला आहे राजमाता मा जिजाऊ चा जिल्हा म्हणून संपूर्ण देशाला सुपरीचीत आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर लोणार सरोवरच्या ख्यातीने प्रसिद्ध आहे अशीच एक भर पाडणारा व जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करणारा महान सम्राट अशोकाने बांधलेल्या८४ हजार स्तुपा पैकी संग्रामपूर तालुक्यातील भोन या गावी सापडलेला प्राचीन बौद्ध स्तूप २००२,२००३, २००५,२००६ या काळात प्रा.डॉ. बी .सी देवतारे यांनी संशोधन करून प्राचीन काळातील पाणीपुरवठा करण्याचा कॅनॉल विटांनी बांधलेल्या 18 विहिरी व 10 दगडी गोलाकार विहिरी अशा एकूण 28 विहिरी भोन या गावात आहेत विशेष म्हणजे तिथे एक भव्य दिव्य अशा बौद्ध स्तूप सापडलेला आहे त्याचबरोबर भिक्षापात्राचे तुकडे , छताच्या फरशांचे तुकडे ,विटांचे तुकडे आणि काळ्या व तांबड्या भांड्याप्रमाणे मातीची भांडी देखील मोठ्या प्रमाणात सापडले आहे या स्तूपाकडे केंद्र सरकारचा पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. शासनाने याकडे गांभीरपूर्वक लक्ष देऊन या मौर्यकालीन स्तूपाचा संवर्धन करावं यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी असंघटित बांधकाम कामगार या संघटनेचे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रभारी विनोद पवार यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे व तमाम महाराष्ट्रातील कामगारांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सामील होण्याकरता आवाहन करण्यात येत आहे या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने महाराष्ट्रातील असंघटित बांधकाम कामगार हे उपस्थित राहतील