बुलढाणा,
बुलढाणा जिल्ह्याच्या भवन येथील बुद्ध स्तूप संरक्षणासाठी आणि उत्खननासाठी 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा…
अँकर – बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपुर तालुक्यातील भुवन येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना उत्खनन करताना बुद्ध स्तूपाचे अवशेष आढळले आहे मात्र याच्या उत्खनन आणि संवर्धन संरक्षणासाठी शासनाची मोठी उदासीनता पाहायला मिळत आहे शासनाकडून या बुद्ध स्तूपाचे उत्खनन व्हावे त्या स्तूपाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयावर 17 मार्च रोजी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या मोर्चामध्ये राज्यातील असंख्य नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आज ती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे… या पत्रकार परिषदेत मधुकर गव्हांदे श्रीकांत ओहळ कुणाल पैठणकर सुषमा राजदीप संगीता मोहोळ प्रताप पाटील एनडी कोलते अनिल मोरे किसन धुरंदर समाधान ताजणे सुजित बांगर प्रेम शिंदे आकाशवाणी प्रकाश धुरंदर यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.