बेरोजगारांची कर्जप्रकरणे अडविणाऱ्या बॅंक व्यवस्थापकांच्या तोंडाला काळे फासणार
वंचित युवा आघाडीचा प्रशासनाला इशारा
वंचित युवा आघाडीचा प्रशासनाला इशारा
बुलढाणा, (प्रतिनिधी )..
सुशिक्षित बेरोजगार युवकांना विविध उद्योग उभारण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग केंद्रामार्फत शासन योजना राबवित आहे. मात्र, अशा कर्जप्रकरणांचे प्रस्ताव विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये धूळखात पडले आहेत. जाणूनबुजून सुशिक्षित तरुणांची कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवली जात आहेत. सर्व कर्जांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत; अन्यथा कर्तव्यात कसूर करून कर्जास नकार देणाऱ्या बॅंकांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी दिला आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. त्यांना छोटा, मोठा उद्योग उभारता यावा, यासाठी युवकांच्या कर्जप्रकरणांच्या फाईल तातडीने मार्गी लावाव्यात, या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार, अनेक राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापक आपल्या बँकेचे टार्गेट पूर्ण झाल्याचे सांगून वेळकाढूपणा करत कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. काही करण्याची उमेद बॅंका काढून घेत असल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये नैराश्य येत आहे. वास्तवित पाहता शासन स्तरावर बेरोजगारांना आर्थिक प्रवाहामध्ये आणण्याचे हेतूने अनेक योजना राबविल्या जातात. त्या संबंधित अनेक विभागांकडे विविध प्रकारे आर्थिक उपाययोजना केल्या आहेत. अनेक पात्र व कार्यक्षम असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांची कर्ज प्रकरणे जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग खात्यामार्फत राष्ट्रीयीकृत बँकांना अंतिम मंजुरातीसाठी पाठविली जातात. मात्र, बँक व्यवस्थापक त्याकडे नकारात्मक भावनेने पाहतात. सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अपमानजनक वागणूक देतात. काही बँक व्यवस्थापक तर विशिष्ट वर्गातील लोकांची प्रकरणे मंजूर करतात. मात्र, मागासवर्गीयांना डावलले जाते, असा गंभीर आरोपही पवार यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या मनमानी व नकारात्मक वागणुकीमुळे अनेक विभागांचे फंड मार्चअखेरीस परत जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. याबाबत त्वरित दखल न घेतल्यास बॅंक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.