महा-ई-सेवा केंद्राचे परवाने तात्काळ रद्द करा!  समाधान चिंचोले यांची मागणी

महा-ई-सेवा केंद्राचे परवाने तात्काळ रद्द करा!
समाधान चिंचोले यांची मागणी

बुलडाणा तालुक्यातील महा-ई-सेवा केंद्र चालक मनमानी करत आहे. नागरिकांकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा त्यांनी लावलेला आहे. पावतीवर जी रक्कम आहे ती ते कधीच घेत नाही मनमानी करतात. खेडेगावात नागरिकांच्या सोयीसाठी महा-ई-सेवा केंद्राचे परवाने दिलेले आहेत. परंतु हे महा-ई-सेवा संचालक खेडेगावात थांबत नाही. शहराच्या ठिकाणी आपली दुकाने थाटून बसलेले आहे. तहसील कार्यालयाच्या आजूबाजूने जवळपास ५० ते ६० दुकाने आहेत. त्या सर्व दुकानांमध्ये खेडेगावातील महा-ई-सेवा धारकांनी आपली लॉगिन आयडी व पासवर्ड बहाल केलेला आहे व आपली दुकानेही लावलेली आहे. बुलडाणा शहरात केवळ तीन महा-ई-सेवा केंद्र आहेत. या व्यतिरिक्त असलेली दुकाने तात्काळ बंद करून त्या महा-ई-सेवा चालकांची आयडी तात्काळ बंद करा. अन्यथा दिनांक ५ जून पासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. व होणाऱ्या परिणामास आपण व संबंधित अधिकारी जबाबदार राहाल असे निवेदन  समाधान चिंचोले यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना दिले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *