- उन्हाळी प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास शिबीराचा समारोप
बुलडाणा, दि. 9 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, तसेच जिल्ह्यातील एकविध खेळांच्या संघटनांतर्फे दोन सत्रात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तीमत्व विकास शिबीर पार पडले. शिबीराचा समारोप शनिवार, दि. 4 मे रोजी करण्यात आला.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय तिरंदाजी प्रशिक्षक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी चंद्रकांत इलग, महाराष्ट्र राज्य ॲथलेटीक्स असोसिएशन उपाध्यक्ष गोपालसिंग राजपूत, तालुका क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव, नेहरु युवा केंद्राचे अजयसिंह राजपूत, मुख्याध्यापक गजानन इंगळे, प्रशिक्षक विजय वानखेडे, सागर उबाळे आदी उपस्थित होते.
यावेळी अजयसिंह राजपूत आणि गोपालसिंग राजपूत यांनी मार्गदर्शन केले. शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. शिबीरात राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली विविध एकविध खेळ संघटनेचे तज्ज्ञ मार्गदर्शक, राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले. विजय वानखेडे यांनी मैदानी खेळ, उज्वला लांडगे, मनोज श्रीवास, अनिल चव्हाण यांनी हॅण्डबॉल, मोहम्मद इद्रीस यांनी कबड्डी, सागर उबाळे यांनी खो-खो, चंद्रकांत इलग यांनी आर्चरी, राहुल औशलकर यांनी फुटबॉल खेळाचे मार्गदर्शन केले.
बी. एस. महानकर यांनी प्रास्ताविक केले. मनोज श्रीवास यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विनोद गायकवाड, सुहास राऊत, कृष्णा जाधव, तेजस्वीनी घाडगे यांनी पुढाकार घेतला.