नुकत्याच दि 2 जुले ते 11 दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेचे आयोजन दक्षिण कोरिया या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतीय संघ देखील दाखल झाला होता. या भारतीय संघात महाराष्ट्रातून मानव जाधव या खेळाडूची निवड झाली होती. या स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट खेळी करून सिल्वर पदक प्राप्त केले आहे. मानव जाधव हा शिवसाई युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेजमध्ये कोलवड बुलढाणा या महाविद्यालयात वर्ग 12 मध्ये शिक्षण घेत आहे. मानवणे या अगोदर देखील आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून दिली आहे. मानव हा जिल्हा प्रशिक्षण केंद्रात रोज सराव करतो. यावर्षी मानवणे खेलो इंडिया युथ स्पर्धेत देखील आपल्या राज्याला पदक प्राप्त करून दिले आहे. मानवला महाराष्ट्र शासनातर्फे स्कॉलरशिप देखील दिली गेली आहे. मानवच्या या यशाबद्दल शिवसाई युनिव्हर्सल स्कूलचे संचालक डी एस लहाने सर , प्राचार्य दाभाडकर सर यांनी देखील मानवचे अभिनंदन केले आहे. मानवणे आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडील प्रशिक्षक चंद्रकांत इलग सर क्रीडा शिक्षक सागर उबाळे सर यांना दिले आहे. थोड्याशा गुनाने भारतीय संघ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत क्वालिफाय होऊ शकला नाही. तरी यापुढे चांगली तयारी करून भारतीय संघ ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत क्वालिफाय होईल अशी आशा बोलताना डी एस लहाने यांनी व्यक्त केली आहे. सर्व क्रीडा क्षेत्रात मानवचे अभिनंदन व स्वागत होत आहे.