शडयंञाने चळवळीच्या कार्यर्त्याला संपवू नका.पूरस्कार वितरण कार्यक्रमात भाई कैलास सुखधानेंचा हल्लाबोल.
मेहकर..
राजकारणात व समाजकारणात एक कार्यकर्ता तयार होण्यासाठी विस पंचविस तीस वर्ष लागतात. कार्यकर्त्याचे काम काही सोपे नसते. घरावर तूळशीपञ ठेवून कार्यकर्ता अन्याय अत्याचारा विरोधात लढत असतो.वर्षानूवर्ष निष्ठेने
काम करत असतो. त्याला कूठल्याही पदाची अपेक्षा नसते.कार्यकर्ता ही डिग्री त्याच्यासाठी फार मोठी असते. त्या डिग्री साठी त्याचे खूप भांडवल खर्ची झालेले असते. त्यामूळे चूकीच्या मार्गाचा अवलंब करून शडयंञाने कार्यकर्ता संपवू नका. ज्या कार्यकर्त्याने
तूमची नेते पदाची हवेली ऊभी केली असते त्या कार्यकर्त्याची झोपडी ऊजाड करण्याचे पाप कधीही माफ होणारे नसते. असा थेट हल्लाबोल भीमशक्तीचे राज्य सरचीटणीस भाई कैलास सुखधाने यांनी या वेळी केला.
ते तथागत ग्रूप आॅफ महाराष्ट या सामाजीक संघटनेच्या वतीने आयोजीत भीमरत्न पुरस्कार वितरन सोहळ्यात बोलत होते. विचारमंचावर महाराष्ट प्रदेश काॅग्रेसचे सरचिटणीस शामभाऊ ऊमाळकर, राष्टवादी सामाजीक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष कांबळे,शिवसेनेचे ऊपजिल्हा प्रमूख आशिष रहाटे, शहरप्रमूख किशोर गारोळे,अनिकेत सैनिक स्कूलचे अध्यक्ष अर्जूणदादा गवई,आंबेडकरी चळवळीचे नेते भाई दिलीप खरात,भाई प्रकाश पचेरवाल, अरूनभाई डोंगरे, राष्टवादीचे तालूकाध्यक्ष गजानन सावंत , भीमशक्ती महीलाध्यक्षा आरतीताई इंगळे,यूनूस पटेल, अॅड संदिप गवई, प्रकाश सुखधाने शरद ईंगळे, कार्यक्रमाचे आयोजक संदिप रमेश गवई, कूणाल माने, गजानन सरकटे यांचे सह जिल्हाभरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला ऊपस्थीत होते.
पूढे बोलतांना भाई
सुखधाने म्हणाले सध्या देशातगल्ली पासुन दिल्ली पर्यत तिरस्काराचे वातावरण आहे.अशा तिरस्काराच्या वातावरणातही तथागत संघतनेचे अध्यक्ष संदिप गवई हे लोकांना समतेचा पूरस्कार वाटत आहेत. तथागतांची करूणा मैञीची भावणा समाजात रूजवत आहेत.
अशा प्रामाणीक कार्यकर्त्याला समाजाने बळ द्यावे.
आवाहन देखील भाईंनी आपल्या भाषणात केले.
या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीत निष्ठेने काम करणा-या कार्यकर्त्यांचा भीमरत्न पूरस्कार देवून यथोचित सन्मान व गूणवंत विद्यार्थ्याचा सत्कार ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाल्या ऊपस्थीतीने अशोका हाॅल खचाखच भरला होता. या कार्यक्रमाचे सुञ संचालन कृष्णा हावरे सर यांनी केले. तर आभार यूणूस पटेल यांनी मानले.
ृ