*त्या दोन्ही घटनेच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीकडून जाहीर निषेध*
चिखली -संपूर्ण महाराष्ट्रात वादंग निर्माण केलेल्या पंचवटी नाशिक व केळवद तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे सुद्धा आंबेडकरी चळवळीतील सामूहिक मारहाण प्रकरणातील दोन्ही आरोपींना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशा आशयाचे निषेध निवेदन चिखली तहसीलदार यांचेमार्फत बुलढाणा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या महाराष्ट्रासह भारतात लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली अन महाराष्ट्रातील दोन समाजात ते निर्माण करण्याच्या उद्देशाने पंचवटी जिल्हा नाशिक व केळवद तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या दोन्ही प्रकरणातील आरोपी हे स्वतः एवढे मोठे धाडस करू शकत नाहीत या संपूर्ण दोन्ही प्रकरणामागे एक मोठी अदृश्य मास्टर माइंड शक्ती आहे ही शक्ती जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग व प्रशासनाच्या लक्षात येत नाही तोपर्यंत शासनाने आपली तपास यंत्रणा कामाला लावून समोरील दोन्ही आरोपी प्रकरणातील आरोपींना तात्काळ कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी विनंती वजा सूचना देणारे निवेदन चिखली तालुक्यातील तमाम आंबेडकरी सर्व गट सामाजिक संघटना व चळवळीतील ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यासह चिखली तालुक्यातील हिम्मतराव जाधव भाई सिद्धार्थ पैठणे भाई सिद्धांत वानखेडे सतीश पैठणे सतीश पंडागळे मनोज जाधव आम्रपाल वाघमारे सौ संघमित्रा कस्तुरे उषा साळवे उषा इंगळे शोभा वाघमारे विनोद साळवे दीपक साळवे अरुण आराख राजेश बोर्डे शिवगंगा गवारे सुरज इंगळे प्रकाश बनकर रमेश साळवे राजू लहाने राहुल घेवंदे किरण पंडागळे विशाल गवई सह असंख्य असंख्य महिला पुरुष व युवा कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आंबेडकरी चळवळीचे नारे देत तहसील कार्यालय गजबजुन सोडले होते