नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी
-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलडाणा, दि. 26 : भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2024 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होणारे आणि अद्याप मतदार नोंदणी केलेली नसलेल्या युवाना मतदार नोंदणीची संधी प्राप्त होणार आहे. यासाठी मतदारयादीत नसलेल्या नागरिकांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, नायब तहसिलदार संजय बंगाळे आदी उपस्थित होते.
नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात voters.eci.gov.in आणि वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करून सादर करावा. ऑफलाईन स्वरूपात संबंधित बीएलओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल. यासाठी अर्ज आणि लिंक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या ceo.maharashtra.gov.in आणि buldhana.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. वोटर हेल्पलाईन ॲपद्वारे अथवा टोल फ्री क्रमांक 1950 वर मतदारांनी मतदारयादीत आपले नाव असल्याची खात्री करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे