जिल्ह्यातील 6 ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे राहतील… रविकांत तुपकर
रविकांत तुपकर लढणार विधानसभा…. निर्धार मेळाव्यात निर्धार…
बुलढाणा जिल्ह्यातील 6 विधानसभा स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा रविकांत तुकाराम आज निर्धार मेळाव्यात केली
बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, खामगाव, जळगाव जामोद संग्रामपूर या विधानसभेत उमेदवार देणार असल्याचं या निर्धार मेळाव्यात ठरले
बुलढाणा लोकसभेत रविकांत तुपकर यानी सर्व राजकीय पक्षांचे धाबे दणाणून सोडले होते. बुलढाणा लोकसभेत तिसऱ्या क्रमांकाची जवळपास 2 लाख 49 हजार 963 मत घेऊन आपली राजकीय जीवनातली पहिलीच निवडणूक लढवून ताकद दाखवून दिली.
त्यामुळे आता पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका लढवायच्या किंवा नाही यासाठी आज बुलढाणा शहरातील गोलांडे लोन येथे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती यामध्ये कार्यकर्त्यांनी आपले मते मांडली यावर साधक बाधक चर्चा करून रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभेतील 6 ही विधानसभेत निवडणुका लढणार असल्याचा ठाम निर्धार केला आहे. आणि त्याचे स्वागत देखील त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.
मात्र *रविकांत तुपकर कुठल्या विधानसभेतून निवडणूक लढणार हे निश्चित केलं नसलं तरी विधानसभा लढणार हे मात्र निश्चित..*