उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे झाले शिक्षक ..

उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे झाले शिक्षक ..

मतदान केंद्रांची पाहणीसाठी गेले आता घेतला विद्यार्थ्यांचा क्लास…

खडसे यांनी प्रात्यक्षिकातून शिकविली रान वेडी कविता…

सिंदखेडराजा येथील
उपविभागीय अधिकारी प्रा संजय खडसे है मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी देऊळगाव राजा शहरातील नगर परिषद शाळेला भेट देण्यासाठी गेले आसता त्याठिकाणी
पाहणी केल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला .. यावेळी शाळेत मराठीचा तास चालू असताना उपविभागीय अधिकारी खडसे यांच्यातील शिक्षक जागा झला आणि त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मोह आवरला नाहीय, खडसे यांनी त्याच मराठी पुस्तकातील रानवेडी हि कविता विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह शिकविली.. रानवेडी कविता चा अर्थ समजून सांगताना रान काय असते ,त्यासाठी विद्यार्थी याना फळ्यावर डोंगर काढायला सांगितले , पावसासाठी ढग आणि ढगातून पडणारे पाणी , त्या रानवर रानफुल कसे उगवतात त्याचे चित्र, तसेच त्या डोंगरावर रान वेडी मुलगी कशी उभी राहते , याचे चित्र मुलांना काढायला सांगून या कवितेमध्ये ते रममाण झाले असल्याचे पाहायला मिळाले … अशा प्रकारे उच्च पदस्थ अधिकार्यांनी दौऱ्यावर असताना शाळेला भेटी दिल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल ..

 

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *