बुलढाण्यात साकारणार के.जी. ते पी.जी. करिता अत्याधुनिक वसतिगृह

महाराष्ट्रात प्रथमच नगरपालिका अंतर्गत निर्माण होणार वस्तीगृह

बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील गरीब शेतकरी मजूर यांच्या केजी ते पीजी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची सोय व्हावी याकरिता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून लवकरच अत्याधुनिक वस्तीगृह साकार घेणार आहे. सदरचे वस्तीग्रह हे नगरपालिका अंतर्गत निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच एखाद्या नगरपालिके अंतर्गत होणारे हे पहिलेच वस्तीगृह असल्याने सदर विषय चर्चेचा बनला आहे.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या व विषय त्यांनी मार्गी लावले आहेत बुलढाणा सारख्या ठिकाणी त्यांनी कृषी महाविद्यालय, तसेच नगरपालिकांच्या शाळा या सीबीएससी पॅटर्न मध्ये सुरू करून दाखविले आहे
त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ओळख एज्युकेशन हब अशी होत आहे. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून अठरापगड जातीच्या मुलांसाठी नर्सरी केजी ते केजी टू व सीबीएससी याचे शिक्षण सुरू केले आहे परंतु ग्रामीण भागातील जनतेला या शिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती त्यामुळे इच्छा असून सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी सदर सीबीएससी शाळेचा लाभ घेऊ शकत नव्हते
बुलढाणा शहरात विशिष्ट समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची व्यवस्था आहे मात्र ते नाजूर्स व अपूर्ण असल्याने अनेक विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकत नव्हते
सदर विषयाचे गांभीर्य पाहता आमदार संजय गायकवाड यांनी
हा विषय देखील मार्गी लावण्याचा चंगच बांधला आहे. त्या अनुषंगाने आमदार गायकवाड यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषद वितरित केलेल्या जाणाऱ्या निधीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या जुन्या आणि वितरण जागेजवळ तीन कोटी रुपयांच्या वस्तीगृहास मंजुरात मिळून दिली आहे या ठिकाणी मुला-मुलींकरिता सदरचे वस्तीगृह उभे राहणार आहेत सदर कामासाठी विविध टप्प्यात तब्बल सहा कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहे या निधीतून अत्याधुनिक वस्तीगृह उभे राहणार असून सदर वस्तीग्रहाचा लाभ विद्यार्थ्यांना पुढील सतरा पासून घेता येणार आहे अशा प्रकारचे वस्तीग्रह बांधणारे ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असल्याने चर्चा होत आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *