उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाची तळमळ आहे. त्यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्ती शिवसेना (उबाठा) पक्षासोबत जोडलेला आहे. येणाऱ्या काळात शिवसेनेचे विचार तळागाळापर्यंत पोहचवा, असे आवाहन जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जुलै रोजी युवा नेतृत्व संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनात येथील गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो तरुणांनी रक्तदान केले. यावेळी तालुकाध्यक्ष लखनभाऊ गाडेकर, शहर प्रमुख हेमंत खेडेकर, किसानसेनेचे अशोक गव्हाणे, युवानेते अमोल बुधवत, युवासेना उपजिल्हा प्रमुख डॉ. अरुण पोफळे, युवासेना शहर प्रमुख सचिन परांडे, उप तालुका प्रमुख संजय गवळी, ओमप्रकाश नाटेकर, विजय इतावारे, माजी पंचायत समिती सभापती सुधाकर अघाव, एकनाथ कोरडे, आशिषबाबा खरात, मोहम्मद सोफियान यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून गेल्या २३ वर्षांपासून आपण सामाजिक कार्य करीत आहोत. रक्तदान चळवळीला बळकटी देण्यास आपले प्राधान्य आहे. भविष्यात शिवसेनेचे पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाला सरपंच रामेश्वर बुधवत, उपसरपंच राजु मुळे, रवी गोरे, राहुल जाधव, अनिकेत गवळी, रामू राजपुत, सरपंच भगवान नरोटे, अनिल जाधव, संभाजी शिंदे, संतोष आवटे, वीरेंद्र बोरडे, रवींद्र मिसाळ, सुधाकर मुंढे, गोविंद दळवी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.