आण्णाभाऊंनी फकीरा कादंबरी लिहून सामाजीक संघर्षाचा पाया रचला.
भाई कैलास सूखधाने
मेहकर ………
साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यामध्ये फकिरा कादंबरी लिहून संघर्षाचा पाया रचला.फकिराने समाजातील तळागाळातील लोकांना सोबत घेतले व सामाजीक भूमीका पार पाडली.या कादंबरीत समतावादी तत्वज्ञानआहे.समाजाला न्याय मागून मिळत नसतो तर तो हिसकावून घ्यावा लागतो.
असा विचार आण्णाभाऊनी फकिरा मध्ये मांडला असे विधान भीमशक्तीचे सरचिटणीस भाई कैलास सुखधाने यांनी केले.
ते पार्डा ता मेहकर जिल्हा बूलढाणा येथे साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त आयोजीत अभीवादन सभेत बोलत होते .
या वेळी मंचावर भीमशक्ती संघटनेचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने. युवा नेते विशाल तांगडे, किशोरदादा गवई अॅड विजय बाहेकर,छगन बच्छीरे,विष्णु कावळे,ऊध्दवराव शिंदे,(स्वामी) किशोर क्षीरसागर,रमेश क्षीरसागर,प्रमोद क्षीरसागर,कैलास शिंदे, शरद इंगळे माजी सरपंच रामभाऊ पवार जयताळा, पार्ड्याच्या सरपंचा बच्छीरेताई,व ईतर मान्यवर ऊपस्थीत होते .
या जयंती कार्यक्रमात कु राणी कांबळे ही विद्यार्थीनी पोलास दलात भरती झाल्याबद्दल गावक-यांच्यावतीने भाई कैलास सुखधाने यांच्या वमान्यवरांचे हस्ते कु राणी कांबळे हीचा यथोचित्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील सरपंच, ऊपसरपंच, ग्रा प सदश्य, पंचशिल मिञ मंडळ, रिपब्लीकन पॅथ्थर, लहू शक्ती संघटनेचे पदाधिकारी महीला पूरूष मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार ऊध्दव शिंदे यांनी मानले