हेकेखोर गटविकास अधिकारी मुकेश मोहोर यांच्या वर्तणुकीवर ताकीद,

हेकेखोर गटविकास अधिकारी मुकेश मोहोर यांच्या वर्तणुकीवर ताकीद,

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांचा सक्त आदेश,

एटापल्ली;(गडचिरोली)
येथील पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी श्री मुकेश मोहोर हे कार्यालयात रुजू झाल्यापासून कोणतेही विकास कामांकडे लक्ष न देता, कुरघोड्या करून सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे धोरण राबवितात, लोक प्रतिनिधी व सामान्य नागरिकांशी हेकेखोरपणे, असभ्य, गैरवर्तणुकीने वागतात, त्यामुळे यांच्या कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सेवेतून बडतर्फच्या कारवाहीची मागणी संघटित व्यापारी संघटना अध्यक्ष मनोहर बोरकर व व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांना पाठविलेल्या निवेदनातून केला होती, त्यावरून झालेल्या चौकशीत मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी मुकेश मोहोर यांचा खुलासा मान्य करून यापुढे अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये अशी ताकीद दिली आहे.

एक वर्षांपूर्वी पंचायत समिती एटापल्ली येथे कार्यरत असलेले व सध्या पंचायत समिती देऊळगावराजा जिल्हा बुलढाणा येथे कार्यरत गटविकास अधिकारी मुकेश मोहोर यांच्या विरुद्ध ते स्वतःला पंचायत समितीचे मालक समजून नागरिकांसोबत गुलामप्रमाणे वागून कोणत्याही विकास कामाची त्यांना काही सोयर सुतक नसून उद्धट व असभ्य भाषेत लोकांना धमकावत असल्याचा आरोप संघटित व्यापारी संघटना पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केला होता, त्यामुळे अतिमागास आदिवासी बहुल तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे, मोहर यांच्या प्रशासनातील भ्रष्टाचाराविरुद्ध कोणीही लोक प्रतिनिधी व नागरिकांनी आवाज उठविण्याची हिम्मत करू नये अशा उद्देशाने ते सामान्य नागरिकांशी उद्धट, असभ्य व गैरवर्तनिकीने वागत असल्याचा संशय व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या हेकेखोर पणाचा विपरीत परिणाम होऊन आदिवासी, गरीब व गरजू कुटुंबे, महिला बचत गट व शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध वयक्तिक, सामूहिक लाभाच्या योजना, पिण्याचे पाणी, घरकुल, शौचालय, शेती उपयोगी साधने, अशा नागरी उन्नती व स्त्री सबलीकरणांच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे, आधीच विकासापासून कोसो दूर असलेल्या व आशिक्षितांनी लक्षणीय संख्या असलेल्या एटापल्ली तालुक्यात समस्यांचा डोंगर उभा आहे, अशातच भ्रष्ट प्रवृत्तीचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मनमानी प्रशासकीय कारभार चालवून सामान्य नागरिकांना वेठीस धरून नाहक त्रास दिला जाणे अन्यायकारक असल्याचे निवेदनातून म्हटले होते, त्यावेळी व्यापाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेऊन एक महिन्यातच मुकेश मोहोर यांची जिल्ह्याबाहेर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा पंचायत समितीमध्ये तडकाफडकी बदली करून चौकशी सुरू करण्यात आली होती, चौकशी दरम्यान गटविकास अधिकारी मुकेश मोहोर यांनी सादर केलेल्या खुलासा मान्य करून मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी मोहोर यांना सक्त ताकीद देऊन यापुढे कर्तव्य बजावतांना गैरवर्तणुकीची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ताकीद देण्यात येत असल्याचे पत्र पंचायत समिती देऊळगावराजा येथे पाठविले आहे.

जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांनी गटविकास अधिकारी मुकेश मोहोर यांना ताकीद दिल्याने संघटित व्यापारी संघटना अध्यक्ष मनोहर बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, उपाध्यक्ष रवि रामगुंडेवार, विशाल बाला, सचिव व्यंकटेश कंदीवार, लक्ष्मण नरोटी, जितेंद्र चिचघरे, विनोद पत्तीवार, तुलसीदास गुडमेलवार, नांटू डे, देवशीष मंडळ, प्रकाश गावडे, भगवान चाफले, प्रशांत टेलकुंटलवार, विपुल बिश्वास, उपेश सुरजागड, अशोक उल्लीवार, गौतम मुजुमदार, निलेश गंपावार, अजय बिश्वास, भ्रिगु सरकार, नमिता बल्लाव, सरीता राजकोंडावार, रतीप शेख, जगदीश मडावी, कार्तिक बारोई, महानंद मंडल, बाबू बासाड, विनय मंडल, संतोष खापणे, तपन तपाली, सौरभ संगीडवार, विजय नगराळे, प्रफुल आईलावार, सुनील मोहूर्ले, पंकज पत्तीवार, नरोत्तम अधिकारी, रामू गुंडावार, चेतन दुर्गे, अनिल बुग्गावार, गुरुदास बारसागडे, उत्तम पाल, तारक मुजुमदार, दिवाकर मोहूर्ले, सुरेश मोहूर्ले प्रीती मोहूर्ले, निजन पेंदाम, नूर शेख, कृष्णा उप्पलवार व रमेश ओडपल्लीवार, अशा नव्वद व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे,

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *