निमा संघटना व महिलांच्या वतीने कोलकत्ता येथील घटनेचा निषेध व्यक्त…
बुलढाणा निमा संघटना व महिलांच्या वतीने कोलकत्ता येथे डॉ महिलेचा लैंगिक छळ करून खून केल्या प्रकरणाचा बुलढाणा निम संघटना व महिलांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली
कोलकत्ता येथे 9 ऑगस्ट रोजी च्या पहाटे शासकीय वैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटल येथे द्वितीय पदवीत्तर अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांनी ड्युटीवर असताना लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुणपने हत्या करण्यात आली शासकीय ठिकाणी ड्युटीवर असताना महिला डॉक्टर सुरक्षित नाही.
निर्भया प्रकरणानंतर ही कायदे इतके मजबूत होऊन ही त्यांची भीती या नराधमांना नाही
या घटनेचा निमा संघटना स्त्रीमुक्ती संघटना ताराबाई शिंदे स्मृती विकास संस्था लोक मंच बुलढाणा महिला जागृती संस्था दिव्य ज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या शाहिनाताई पठाण निमा संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष डॉ माधवी जवरे, संध्याताई इंगळे, डॉ अस्मिता मनवर, सौ अनिता कापरे, डॉ शारदा वाघ, सौ सुजाता पाठक, सौ संगीता कुलकर्णी, सौ संगीता राठोड, यांच्यासह असंख्य महिला भगिनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घटनेचा निषेध व्यक्त करत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले