केवळ कृत्रिम अवयव  नव्हे तर व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ ही देणार –  आ. संजय गायकवाड

बुलढाणा
अपंगांना सातत्याने अशी जाणीव होते की आपण जन्मापासूनच विकलांग आहोत, आपल्यावर देवाचा कोप आहेण्  मागील जन्मात आपण अनेक पाप केले असावेत त्यामुळे आपणाला या जन्मात ही शिक्षा मिळाली.  त्यामुळे दिव्यांग नैराश्याच्या छायेत जगत असतात.  त्यांना उभारी मिळावी,  त्यांना पाठबळ मिळावे याकरिता सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.  मी केवळ कृत्रिम अवयव  यांच्या माध्यमातूनच त्यांना पाठबळ देणार नसून सातत्याने त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे,  तसेच येणाऱ्या काळात त्यांना व्यवसाय करता यावा याकरता आर्थिक पाठबळ ही उपलब्ध करून देणार आहे.

असे भावनिक आश्वासन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले. ते सोमवारी सैनिक मंगल कार्यालय येथे आयोजित दिव्यांग बांधवांसाठी मोफत साहित्य वाटप कार्यक्रम माझ्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.  यावेळी दिव्यांगांना सायकल, बॅटरीवरील वाहन, यासह  काठ्या, कर्ण यंत्र आदी वितरित करण्यात आले.  बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील अंध अपंग व मूकबधिर नागरिकांसाठी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार,भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर  यांच्या सहकार्याने   बुलढाणा शहरात सदर मेळावा पार पडला.  यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की,  दिव्यांगाला सर्वसामान्य सोबत धावत आले पाहिजे,  त्यालाही जग पाहता आलं पाहिजे,  लोकांमध्ये वावरत आला पाहिजे या उद्देशाने केंद्र सरकारने सदर योजने चालू केली आहे.  या योजनेत स्थानिक आमदारांना काही वाटा टाकावा लागतो.  मी ठरवले होते की काही सभागृह नाही झाले तरी चालेल परंतु अपंगांना उभारी मिळावी यासाठी भरभरुन निधी उपलब्ध करून दिला आहे,  त्यातून मला आत्मिक समाधान मिळत आहे.  अपंगांनी मी अपंग आहे अशी भावना मनात कधी आनू नये, कारण अनेक दिव्यांगाने पर्वत शिखर सर केलेली आहे,  विविध कलाकुसरात निपुणता मिळवलेली आहे व सुंदर जीवन जगत आहेत. आपणही सुंदर जीवन जगावे अशी माझी इच्छा आहे असे उदगार त्यांनी काढले.या वेळी कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील,
युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, समाज कल्याण अधिकारी  मेरत साहेब, तहसीलदार  कुमरे साहेब, गटविकास अधिकारी  वाघ साहेब,  शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, गीते साहेब, किरण पावरा सहायक प्रबंधक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे,,संतोष तांदुळकर,स्वीय सहाय्यक श्रीकृष्णा शिंदे, विवेक घाडगे, विजय आसने, गजानन शिंदे, सर्वेश्वर तामगर, रोहित गवळी  आदी उपस्थित होेते

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *