बुलढाणा दि. 26
बुलढाण्यातील द युथ लिग रिक्रीएशन सेंटरचे विश्वस्त व भारत विद्यालय परिवाराचे अध्यक्ष स्व. हर्षवर्धन आगाशे यांच्या स्मृति प्रित्यर्थ जिल्हास्तरीय लोकगीत समूहगान स्पर्धेचे आयोजन दिनांक 18 सप्टेंबर 2024 बुधवारी करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राथमिक शालेय गटात वर्ग १ ते ४ ,गट -२ माध्यमिक शालेय गट वर्ग ५ ते १०, गट- ३ महाविद्यालयीन गट इयत्ता अकरावी ते उच्च महाविद्यालयातील विद्यार्थी, गट -४ खुल्या गटात संगीत विद्यालय व १६ वर्षावरील स्पर्धकांना फक्त सहभाग घेता येईल. या स्पर्धेत भाग घेणार्या इच्छुक संघांनी भारत विद्यालय परिसरातील युथ लीग रिक्रीयेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नोंदणीसाठी दिनांक 12 सप्टेंबर पूर्वी नोंदणी फी रुपये २०० भरून आपला प्रवेश निश्चित करावा. या स्पर्धेसाठी प्रत्येक गटात प्रथम पारितोषिक रुपये 7001. द्वितीय पारितोषिक रुपये 5001. तृतीय पारितोषिक रुपये 3001. प्रोत्साहन पर रुपये 2001. याशिवाय चषक व सहभागाची प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे. सहभागी सर्व गटातील स्पर्धकांना देखील सहभागाची प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे. या लोकगीत समूहगान स्पर्धेसाठी लिटिल चॅम्प फेम रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पावनखिंड, शेर शिवराज, फत्ते शिकस्त, तसेच ज्ञानेश्वर माऊली या मालिकेचे संगीतकार देवदत्त मनीषा बाजी, इंडियन आयडॉल फिल्म गायक तसेच प्लेबॅक सिंगर आशिष कुलकर्णी, छावा,सुभेदार, कन्नी व बॉस माझी लाडाची या कलाकृतींच्या प्लेबॅक सिंगर निधी हेडगे ह्या परीक्षक म्हणून लावणार आहेत. या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील शालेय कलाकारांनी व संगीत विद्यालयाच्या कलाकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन स्पर्धेचे आयोजक अरविंद पवार कार्यकारणी सदस्य भारत विद्यालय सोसायटी व अंगद आगाशे सचिव भारत विद्यालय सोसायटी तसेच संचालक युथ लीग रिक्रियेशन सेंटर बुलढाणा यांनी केले आहे