पेठ येथील सतीष तायडे यांचा सैनिक सेवा तथा पोलीस नियुक्ती सम्मान सत्कार
पेठ येथील सतीष तायडे यांचा सैनिक सेवा तथा पोलीस नियुक्ती सम्मान सत्कार
चिखली :
तालुक्यातील ग्राम पेठ येथील मारोती गोपाळा तायडे व सौ. गंगा मारोती तायडे यांचे सुपुत्र सतीष मारोती तायडे यांचा भारतीय सैन्य दल १९ महार बटालियन मध्ये १८ वर्षे सेवा करून आपल्या मायभूमीमध्ये परतले असता तथा महाराष्ट्र पोलिस दलामध्ये नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा १ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून चिखली विधानसभा मतदार संघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील, पं. सं. माजी सभापती सिंधुताई तायडे, सैन्य दलातील निकम सर (माजी फौजी), सरपंच विष्णु शेळके (पेठ), सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वृंद, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, माता-भगिनी यासह पंचक्रोशीतील प्रतिष्ठीत नागरिक, पत्रकार बांधव उपस्थित होते.
सर्वप्रथम गावातुन वाजत-गाजत मिरवणुक काढून सतिष तायडे यांचा ठिक-ठिकाणी सत्कार करण्यात आला. तद्नंतर नियोजित ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात आला. सत्कार समारंभात सतिष तायडे यांच्या १८ वर्षाच्या सेवेबद्दल बोलतांना आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी सेवेत कार्यरत असलेल्या जवानाबद्दल बोलतांना, अक्षरशः त्यांच्या डोळ्यांच्या पणा भरभरुण आल्या होत्या. तसेच १८ वर्षे मायभूमीची सेवा करतांना, कुंटूब, आई, वडील, समाज, गाव, यांना बाजुला ठेवून ईमान ईतबारे देशाची सेवा करून परत पोलीस दलात काम करणाऱ्या जवानास पुढील सेवेसाठी सदिच्छा दिल्या.
सत्कारास उत्तर देतांना सत्कारमुर्ती सतिष तायडे यांनी सांगितले की, भारत मातेच्या रक्षणासाठी क्षणोक्षणी जसे सीमेवर डोळ्यात तेल घालुन सेवा दिली. त्याचप्रमाणे पोलिस दलात मी सेवा देईल, असे सांगितले. यावेळी सत्कार समारंभाला आलेले पंचक्रोशीतील उपस्थित स्नेहीजन, गावकरी सोबतच मित्रमंडळी यांना पाहून अश्रु अनावर झाले हे विशेष.
या सम्मान सत्कार सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. पेठ येथील सरपंच विष्णुभाऊ शळके, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, अंकुश नाना तायडे (भाजपा कार्यकर्त), पांडुरंग तायडे, गजानन तायडे, सोनु तायडे, वैभव तायडे, शंकर शेळके, राजु शेळके, गजानन डुकरे, शिक्षक वृंद, समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती.