सभासदांच्या धार्मिक पर्यटनासाठी बुलडाणा अर्बनचा पुढाकार 

सभासदांच्या धार्मिक पर्यटनासाठी बुलडाणा अर्बनचा पुढाकार 

* विशेष रेल्वे द्वारा बौध्दगया, राजगीर, नालंदा, सारनाथ (वाराणसी), लुंबीनी (नेपाळ) व कुशीनगर येथे होणार दर्शन
बुलडाणा 
           प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी या ब्रिदानुसार बुलडाणा अर्बनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामची चांडक उपाख्य भाईजी यांच्या कल्पक नेतृत्वात संस्थेच्या आर्थिक उन्नतीसह आपल्या यशाचा वाटा हा समाजातील प्रत्येकाला व्हावा म्हणून सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रेसर असलेल्या बुलडाणा अर्बनने आता सभासदांसाठी धार्मिक पर्यटनाचे महत्त्व ओळखून विशेष रेल्वे सहलीचे आयोजन सुद्धा केले आहे. यामध्ये बौध्दगया, राजगीर, नालंदा, सारनाथ (वाराणसी), लुंबीनी (नेपाळ) व कुशीनगर येथील पवित्र स्थानांवर सभासदांना वंदन करता येणार आहे.
       संस्थेच्या सभासदांच्या मागणी नुसार संस्थेने यावर्षी बौध्द बांधवांचे पवित्रस्थान असलेले बौध्दगया, राजगीर, नालंदा, सारनाथ (वाराणसी), लुंबीनी (नेपाळ) व कुशीनगर येथे विशेष रेल्वेने एक सहल आयोजित केली आहे. वृध्द व अपंग भाविकांनाही या तिर्थस्थानाचे दर्शन व्हावे या उद्देशाने या विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. सदर ट्रेन २० नोव्हेंबर २०२४ रोजी अकोला येथुन सुटेल. या ट्रेनमधे केवळ ७४८ सभासदांसाठी आसन व्यवस्था असणार आहे. याबाबतचे सहलीचे बॅनर व पॉम्प्लेट लवकरच शाखेवर पाठविण्यात येतील. तरी आपल्या शाखेवरुन जास्तीत जास्त या सहलीस पाठवावे, अशा सूचना भाईजी यांनी शाखा व्यवस्थापकांना दिल्या आहेत.
       सदर सहल ही सर्व धर्मीय लोकांसाठी आहे. त्यामुळे कोणीही व्यक्ती आपले बुकींग करु शकतो. महत्त्वाचे म्हणजे या सहलीमध्ये स्वतः राधेश्यामजी चांडक हे सर्व संचालक मंडळासह सहभागी होणार आहेत. सोबतच बुलडाणा अर्बनचे जे कर्मचारी या सहलीत जावु इच्छीत असतील त्यांना १५ हजार रुपये पर्यंत अग्रीम राशी देखील संस्था देणार आहे. परंतु एका शाखेवरुन जास्तीतजास्त दोन कर्मचारी जावु शकतील. कर्मचाऱ्यांशीवाय इतर भाविकांना जाण्याची इच्छा आहे परंतु रक्कम कमी पडत असल्यास अशा भाविकांना १२ हजार रुपये पर्यंत पी.डी.सी. घेवुन दोन वर्षाच्या मुदतीचे कर्ज करण्यास हिरवी झेंडी भाईजी यांनी दिली असून या कर्ज प्रकरणाची मुख्यालयातुन मंजुरी घ्यावी लागणार आहे.
        यात्रेकरीता प्रमाणे येणाऱ्या खर्चात रेल्वे प्रवास भाडे, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था तसेच रेल्वे स्टेशन ते तिर्थस्थळ दर्शना पर्यंतचा येण्या-जाण्याचा प्रवासखर्च समाविष्ट आहे. तसेच प्रत्येक प्रवाशाला विमा सुरक्षाही राहणार आहे. तरी १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जास्तीतजास्त बुकींग घेवुन मुख्यालयास व पावस इव्हेंट व टूर्स, अकोला यांना कळवावे. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास दरवर्षी विशेष रेल्वेने भारतात दोन टूर्स काढण्यात येईल, अशी ग्वाही देखील या निमित्ताने बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांनी दिली आहे..
 
* अशी राहणार सहल आणि येणारा खर्च
          सहल ८ रात्र ९ दिवसांची राहील स्लीपर कोच  रुपये २३,९००, जीएसटी ५ टक्के प्रती व्यक्ती, एसी ३ टायर कोच रुपये ३३,००० तर एसी २ टायर कोच रुपये  ३८,९००,  जीएसटी ५ टक्के प्रती व्यक्ती, असे असून   9763703175, 9822220808, 9422220808 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *