*पिक विमा न मिळाल्यास कंपनीच्या विरोधात फसवणूकिचा प्रत्येक पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करु -भैय्यासाहेब पाटील*

*उर्वरीत शेतकऱ्यांनाही पिक विमा मिळालाच पाहीजे – डाॕ.ज्ञानेश्वर टाले*
*पिक विमा न मिळाल्यास कंपनीच्या विरोधात फसवणूकिचा प्रत्येक पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करु -भैय्यासाहेब पाटील*
पिक विमा मिळण्यासाठी सातत्याने सरकारच्या व कंपनीच्या विरोधात रविकांतजी तुपकर यांनी बुलढाणा,मुंबई,नगपुर,येथे सिंदखेड येथे अन्नत्याग आंदोलन,मुक्काम आंदोलन,विविध आंदोलन केल्यामुळेच हा पिक विमा मिळाला.जिल्ह्यातील ४७ हजार ७०७ पाञ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११२ कोटी २९ लाख रु.जमा होणार आहेत.काही प्रमाणात जमा झाला असुन अध्याप माञ कंपनीने व राज्य सरकारने अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना खरीपाचा व रब्बीचा पिक विमा दिलेला नसून त्यासंदर्भात मेहकर तालुक्यातून गावागावातून बरेच फोन आम्हाला येत होते व तक्रारी येत होत्या त्या अनुषंगाने आज नायगाव दत्तापूर,वडाळी पारखेड मांडवा येथे शेतकऱ्यांची बैठक घेऊन सन 2023- 24 चा खरिपाचा सोयाबीन पिक विमा तसेच रब्बीचा हरभरा पिक विमा ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही किंवा ज्या शेतकऱ्याने पिक विमा काढला पण तक्रारी केलेले नसल्यामुळे त्यांना पिक विमा मिळाला नाही. उर्वरीत शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेऊन संबंधित विभागाकडे व न्यायालयात जाण्याच्या दृष्टिकोनातून या शेतकऱ्यांची पीक विम्याची लढाई रविकांतजी तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एका नव्या दमाने व ताकतीने हाती घेतली असून मेहकर व लोणार तालुक्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही शेतकऱ्यांची लढाई शेतकऱ्यांना घेऊन एकजुटीने चालू राहील असे आज शेतकरी नेते डॉ. ज्ञानेश्वर टाले व भैय्यासाहेब पाटील यांनी सांगितले उर्वरीत शेतकऱ्यांचा सुध्दा पिक विमा घेऊ यावेळी गणेश धाबे,सलीम शहा,मोहन चव्हाण,दीपक जाधव,विशाल चनखोरे. गावातील शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी शासनाचा निषेध करत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली व निर्धार केला की पिक विमा घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही.लढाई आता आरपार होणार..



