*दुर्गा उत्सवात विधवांना सन्मानाची वागणूक द्यावी – प्रा.डी एस लहाने*
बुलडाणा
*दुर्गा उत्सव स्री शक्तीचे पूजन आहे.*
*स्री रूपातील दुर्गेची पूजा अर्चा करत असताना घरातील विधवा महिलांना सन्मान जनक वागणूक दिल्यास हा उत्सव खर्या अर्थाने साजरा होईल. विधवा बहिणींना उत्सवात मध्ये सहभागी करून घ्यावे असे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी एस लहाने यांनी केले आहे.*
*सद्या सर्वत्र दुर्गा उत्सव महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. दुर्गेची विविध रूपे आहेत, स्री शक्तीचा आदर्श म्हणजे दुर्गा आणि याच विविध रूपांची पूजा अर्चा सध्या केली जात आहे. हे करीत असताना आपल्या घरातील विधवा सून, मुलगी ,भगिनी, जी कुणी विधवा असेल तिला सन्मान जनक वागणूक देण्याचा प्रयत्न केल्यास खऱ्या अर्थाने हा उत्सव साजरा केल्यासारखे होईल. नऊ दिवस सकाळ – संध्याकाळ देवीची पूजा केली जाते. यामध्ये विधवा महिलांना सहभागी करून घेतल्यास चांगला सकारात्मक संदेश देऊन समाज बदलाची मुहूर्तमेढ रोवल्यासारखे होईल.करिता दुर्गा उत्सव मंडळानी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रा. डी एस लहाने यांनी केले आहे.*
*बॉक्स*
*दुर्लक्षित घटकाला न्याय द्या..*
*आपल्याकडे प्रत्येक सण आणि उत्सव उत्साहात साजरे केले जातात.*
*नवरात्रीचे महत्व आपल्याकडे अनन्यसाधारण आहे.अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे शारदीय नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी नवरात्रौत्सव सुरू होत आहे.*
*नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येणार आहे. स्रीरुप देवतेची पूजा करीत असताना घर संसाराचा गाडा चालवून कुटुंबासाठी खस्ता खाणाऱ्या व समाजामध्ये कायम दुर्लक्षित राहिलेल्या विधवांना सहभागी करून घेण्याचे आवाहन प्रा.लहाने यांनी केले आहे.*