शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जयश्री शेळके यांचा पक्षप्रवेश.. महाविकास आघाडी कडून अखेर जयश्री शेळके यांची उमेदवारी.. ए बी फॉर्म ही मिळाला..

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जयश्री शेळके यांचा पक्षप्रवेश..

महाविकास आघाडी कडून अखेर जयश्री शेळके यांची उमेदवारी.. ए बी फॉर्म ही मिळाला..

बुलढाणा विधानसभेची जागा मिळवण्यासाठी अनेकांनी जंग जंग पछाडले परंतु बुलढाणा विधानसभेची जागा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेची केल्याने या ठिकाणी निवडून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी देऊ यामुळे या मतदारसंघात ताकद कोणाची याची चाचपणी करण्यात आली त्यामध्ये काँग्रेसच्या जयश्री शेळके यांच्या नावाचा बोलबाला दिसल्याने त्यांना उबाठात पक्षप्रवेश करून उमेदवारी मिळाली असून एबी फॉर्म ही मिळाला आहे.
बुलढाणा विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, डॉ मधुसूदन साळवे, प्रा सदानंद माळी यांच्यासह अनेकांनी उमेदवारी मागितली होती.
बुलढाणा विधानसभेच्या उमेदवारीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील आग्रही होते. परंतु शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभेत अपक्ष निवडणूक लढवल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा उमेदवार काही मतांच्या फरकाने पडल्याने
शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व पदाधिकाऱ्यांनी तुपकर यांच्या नावाला विरोध दर्शवल्याने महाविकास आघाडीतीलच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या सचिव जयश्री शेळके ह्या मागील वीस वर्षापासून मतदार संघात काम करत आहेत महिला सक्षमीकरण, दिशा महिला बचत गट फेडरेशन, च्या माध्यमातून महिलांचं मोठं संघटन त्यांच्यासोबत आहे तसेच सर्वच जाती-धर्माच्या लोकांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.
जयश्री शेळके यांना उमेदवारी मिळाल्यास बुलढाणा विधानसभेची जागा निश्चितपणे जिंकता येईल असा विश्वास असल्याने मुंबई येथे जयश्री शेळके यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश पार पडला बुलढाणा विधानसभेची उमेदवारी घोषित होण्याची बाकी असली तरी पक्षाचा ए बी फॉर्म मात्र त्यांना मिळाला आहे.
तसेच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर व जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व पदाधिकाऱ्यांनी जयश्री शेळके यांच नाव पुढे केल्याचे बोलले जात आहे.
आदर्श नेतृत्वने या अगोदरच भाकीत केले होते की *पक्ष आमचा उमेदवार तुमचा अशी काहीशी परिस्थिती भविष्यात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बघायला मिळू शकते* परंतु आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जयश्री शेळके यांनी पक्षप्रवेश करून उभाठाची मशाल जयश्री शेळके यांच्या हाती दिली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या मनातील उमेदवारालाच उमेदवारी मिळाल्याने आता बुलढाणा विधानसभेत निवडणुकीत करडी टक्कर बघायला मिळणार आहे.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *