प्रस्थापित उमेदवारांनी मुस्लिम चेहऱ्याला पाठिंबा द्यावा, मी नामांकन मागे घेतो आझाद समाज पार्टीचे सतीश पवार यांचे खुले आव्हान

प्रस्थापित उमेदवारांनी मुस्लिम चेहऱ्याला पाठिंबा द्यावा, मी नामांकन मागे घेतो
आझाद समाज पार्टीचे सतीश पवार यांचे खुले आव्हान

बुलढाणा
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी दाखल केलेल्या मुस्लिम समाजाच्या उमेदवारास येथील महाविकास आघाडी व महायुतीच्या दोन्ही प्रस्थापित उमेदवारांनी पाठिंबा जाहीर करावा, त्याचक्षणी मी माझे नामनिर्देशन पत्र मागे घेतो, असे खुले आव्हान आझाद समाज पार्टीचे उमेदवार सतीश पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज सोमवार, ४ नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे. दुपारी ३ वाजेची वेळ आहे, तोपर्यंत माझा धसका घेतलेल्या उमेदवारांनी मुस्लिमबांधव असलेल्या उमेदवारास जाहीर पाठिंबा द्यावा, त्याचवेळी मी निवडणूक मैदानातून माघार घेतो, असे सतीश पवार यांनी यावेळी सांगितले.
आमच्या पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद यांनी आम्हाला भाईचाऱ्याची शिकवण दिली आहे. आझाद समाज पार्टी जात, पात मानत नाही, महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पक्षाने मुस्लिम उमेदवारांना संधी दिली आहे. बुलढाण्यातील मराठा उमेदवारांनी मुस्लिम उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिल्यास मी उमेदवारी मागे घेऊन मुस्लिम उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करेल, असा शब्दसुद्धा सतीश पवार यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिला.

Deepakmore

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *