भारतीय नागरिकांचे संविधान संरक्षण कवच – साहित्यिक सुरेश साबळे
भारतीय संविधानाच्या निर्मिती कार्याच्या रूपाने डॉ बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भारत देशाचे मुकुटमणी ठरतात. भारत देशातील नागरिकांचा सन्मान,अस्तित्व आणि व्यक्ती स्वतंत्र संविधानाने मुक्तपणे हाती देताना हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्याही सोपवल्या आहेंत.आपल्या देशाच्या राज्यघटनेने देशात जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाची काळजी घेतलेली आहे,भारतीय नागरिकांचे संविधान संरक्षण कवच आहे.हे संविधान चिरंजीव आहे.भारतीय संविधानात स्त्रीपुरुष, लिंग, जाती, पंथ, धर्माच्या आधारावर भेदभावला थारा नाही.समान संधी, दर्जा व स्वतंत्र विचार अभिव्यक्ती, उपासना यांचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेले आहे असे विचार साहित्यिक सुरेश साबळे यांनी स्थानिक नागसेननगर स्थीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित संविधान गौरव दिन कार्यक्रमात मुख्य व्याख्याते बोलतांना मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोधर साळवे तर उपस्थितांमध्ये शाहिर डी. आर. इंगळे, जगन जाधव, शोभा काळे, बेबी जगण जाधव, दिगाबर कासारे, डी. एन. सरकाटे, डॉ. योगेश इंगळे, आशाताई वानखेडे, भास्कर वाकोडे, वामन वानखेडे, आशा मनोहर सरकटे, केसरताई इंगळे, आशा वाकोडे, सुशीला इंगळे, उत्तम जाधव, रमेश आराख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उत्कर्षा साळवेने भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची शपथ सर्वांना दिली. प्रास्ताविक तथा संचलन शाहीर डी. आर. इंगळे यांनी केले तर आभार आणि अध्यक्षीय समारोप डी. एस. साळवे यांनी केले