बातमी

संविधानाची अंमलबजावणी करणारी राज्यव्यवस्था असती तर 50 वर्षांत समता मुलक समाज निर्माण झाला असता.. आ सिद्धार्थ खरात

*संविधानाची तत्वे पालन करणारी माणसे राजकारणात आणावी लागणार : आमदार सिद्धार्थ खरात*
मेहकर: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रदीर्घ काळ लोटूनही समाजात सामाजिक ,राजकीय, आर्थिक न्याय प्रस्थापित झाला नाही. पाच टक्के लोकांपशी 95% संपत्ती आहे तर अजूनही 95 टक्के लोक गरीब वंचित आहे. हा सामाजिक,राजकीय ,आर्थिक न्याय आहे का ? असा सवाल करत आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपस्थित केला, वाजून वेळ गेलेली नाही संविधानाची तत्वे पालन करणारी माणसे राजकारणात आणावी लागणार आहे. अजूनही वेळ गेली नाही आणि त्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२५ मेहकरच्या वतीने आमदार सिद्धार्थ खरात यांना समाजभूषण, किशोर गारोळे यांना युवा उद्योजक तर माधुरी देवानंद पवार यांना अनाथांची आई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर गारोळे तर उद्घाटक म्हणून माधुरी पवार यांची उपस्थिती लाभली होती.
पुढे बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, मेहकर मतदारसंघात वेगळे वातावरण निर्माण झाले आहे. मतदारसंघातील पंधरा वर्षेंचा अंधार संपलेला असून मेहकर मतदारसंघ राज्यासाठी मॉडेल ठरणार आहे. तसेच शिव फुले शाहू आंबेडकर विचारसरणी मानणारे लोक समाजात कधीच महापुरुषांची विटंबना होऊ देत नाही.  समाजातील विविधतेतील एकता आपण जोपासली पाहिजे असे आवाहनही, आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले.
याप्रसंगी आशिष राहाटे, निंबाजी पांडव,दिलीप वाघ, उत्सव समितीचे अध्यक्ष किशोर आराख, किशोर गवई ,संदीप गवई, प्रतीक अंभोरे, रवी पवार ,नागेश आराख, योगेश आराख,रवी डुकरे ,पिंटू सरदार, प्रवीण भिसे, करण देवाजी, अमर कंकाळ, सागर देवाजी, सोनू देवाजी, मनोज नरवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने शहरवासियांची उपस्थिती होती.
 
*मंजुषा शिंदे यांनी सादर केली बहारदार भीम गीते*
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती मेहकरच्या वतीने मंजुषा शिंदे यांचा बहारदार बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या गीत गायनाला भिम अनुयायांनी दाद देत नाचण्याचा आनंद घेतला.

लेकरांमुळे मातृत्व बहाल झाले : माधुरी पवार*
संविधानाने आपल्याला जगायला शिकवले. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मी आज तुमच्यासमोर बोलत आहे. आणि त्यांच्यामुळेच अनेक महिला विविध क्षेत्रात यशाला गवसणी घालत आहे. कुमारी असतानाही लेकरांमुळे मला मातृत्व बहाल झाले. मी अनाथांची माय झाले, असे विचार माधुरी देवानंद पवार यांनी व्यक्त केले.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button