बातमी

आभाळ फुटल्याने सारेच वाहून गेले ; नुकसानीचे पंचनामे पारदर्शी करा – आ. सिद्धार्थ खरात

मेहकर शहराची अवस्था बकाल; नगरपालिकेच्या कारभारावर ओढले ताशेरे!

आभाळ फुटल्याने सारेच वाहून गेले ; नुकसानीचे पंचनामे पारदर्शी करा – आ. सिद्धार्थ खरात

शेतकऱ्यांना मोफत बियाणे व खते मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार, विधानसभेत आवाज उठवणार – आ.खरात

मेहकर शहराची अवस्था बकाल; नगरपालिकेच्या कारभारावर ओढले ताशेरे!

कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही!
मेहकर व लोणार तालुका नव्याने बांधण्याचाही दिला विश्वास !
विविध यंत्रणांची घेतली आढावा बैठक

मेहकर/ बुलढाणा – मेहकर व लोणार तालुक्यात गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने सारेच वाहून नेले असून शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे त्याला आता हातभार लावण्याची गरज आहे, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे पारदर्शक करावे, म्हणजे कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही असे निर्देश आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिले. तसेच दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने मोफत खते व बियाणे उपलब्ध करून द्यावे यासाठी १ जूलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून प्रसंगी विधानसभेत आवाज देखील उठवणार असल्याचेही ते म्हणाले . मेहकर शहराची अवस्था अत्यंत बकाल असून, नगरपालिका करते तरी काय ?असा सवाल करत नगरपालिकेच्या कारभारावर देखील त्यांनी ताशेरे ओढले. कामचुकार अधिकाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही असा इशारा देत , मागे काय झाले हे न पाहता सारे मिळून मेहकर व लोणार तालुक्याची नव्याने बांधणी करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
२५ व २६ जून रोजी मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला .या पावसामुळे शेतीचे ,घरांचे ,तसेच काही ठीकाणी जीवितहानी देखील झाली असून शासकीय मालमत्तेचे देखील नुकसान झाले. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आमदार खरात यांनी काल २९ जून रोजी मेहकर येथील के.व्ही प्राइड हॉटेल येथे विविध यंत्रांणेच्या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून आमदार सिद्धार्थ खरात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शासनाच्या २७ मार्च २३ रोजीच्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार कारवाई करा. या शासन निर्णयामध्ये मदतीचे १२ निकष दिलेले असले तरी यामध्ये महापूर,पूर, ढगफुटी यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या मदतीची बाबत स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. तर तरतूद नसलेल्या नुकसानी बाबत शासनाकडे विशेष पॅकेज देखील मागण्याची तरतूद या शासन निर्णयामध्ये आहे‌ . त्यामुळे पंचनाम्यांमध्ये सर्वच नुकसानीचा समावेश करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मतदारसंघातील फुटलेले तलाव, रस्ते, इतर नुकसान संदर्भात सर्वेक्षण करून त्याची तातडीने दुरुस्तीबाबत उपाययोजना कराव्यात. काही अधिकाऱ्यांना कामापेक्षा सदर कामातून ‘खिसा’ कसा ‘वजनदार ‘ होईल याची काळजी जास्त असते ,त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले. पेनटाकळी कालव्याच्या कामात हलगर्जी करणाऱाची चौकशी तर केल्याच जाईल, परंतु सदर कालव्याची दुरुस्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मेहकर तालुक्यातील उतावळी, काच, पैनगंगा तसेच इतर नद्या, नाले ,कालवे आदींना आलेल्या पुरामुळे जमीन खरडून गेली असून पेरणी सुध्दा वाया गेली आहे. तसेच काही ठिकाणचे पुल, रस्ते देखील वाहून गेली आहेत याबाबतच्या नुकसानीची मी पाहणी केली आहे. याबाबत संबंधित विभागांनी स्वतः जाऊन पाहणी करावी कारण परिस्थिती अत्यंत भयानक आहे असेही म्हणाले. कामचुकार अधिकाऱ्यांनी आताही सुधारावे अन्यथा कारवाईला तयार राहावे असा दम देखील त्यांनी यावेळी दिला . मेहकर शहराची अवस्था अत्यंत बकाल असून ठिकठिकाणी घाण तुंबली आहे . नगरपरिषद करते काय, असा सवाल विचारत कारभारावर ताशेरे ओढले . बैठकीला गैरहजर असणाऱ्या अधिकार्यावर कारवाई प्रस्तावित करणार असल्याचेही ते म्हणाले . संचालन शैलेश बावस्कर यांनी केले. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर, काँग्रेस नेते अनंतराव वानखडे, शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख आशिष राहाटे, तहसीलदार निलेश मडके यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी निंबाजी पांडव, किशोर गारोळे, आकाश घोडे,गटविकास अधिकारी दिनकर खरात, तहसीलदार निलेश मडके, तहसीलदार भूषण पाटील,जि.प. उपविभागीय अभियंता संजय मोरे, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता विरेंद्र कळसकर,यांचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दत्तक ग्राम मेळजानोरी व मढीचे रुपडे पालटणार!
मेहकर तालुक्यातील मेळजानोरी व लोणार तालुक्यातील मढी हे गावे मी दत्तक घेतली असून,या गावांच्या विकासाची काळजी करू नका. सर्वात अगोदर या गावचे रूपडे पालटेल अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी दिली.

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button